ji24news

मध्य वैतरणा धरणाच्या पायथ्याशी ‘ ब्लास्टींग’काम उरकण्यासाठी ठेकेदाराकडुन नियमांचा भंग,वनविभागाची परवानगी नाही, काम थांबवले मात्र कारवाई कधी ?

,

मध्य वैतरणा धरणाच्या पायथ्याशी ‘ ब्लास्टींग’ ,काम उरकण्यासाठी ठेकेदाराकडुन नियमांचा भंग

वनविभागाची परवानगी नाही, काम थांबवले मात्र कारवाई कधी ?

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी २०१४ साली मोखाडा हद्दीत मध्यवैतरणा प्रकल्पाची निर्मिती करून धरण बांधण्यात आले.यावेळी आसपासची बरीच गावे विस्थापित झाली लाखो झाडे तोडण्यात आली मात्र एकदाचा हा प्रकल्प तयार करण्यात आला आता याच धरणावर विद्युत प्रकल्पही होणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचेही काम सुरू क्ररण्यात आले आहे मात्र धरणाच्या पायथ्याशी खोदकाम करताना सदर कामाची उरक व्हावी म्हणून चक्क ब्लास्टींग लावून स्फोट घडवल्याने या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे उद्या काहि अनुचित प्रकार घडल्यास जी आर्थिक मनुष्यहानी होणार आहे याला जबाबदार कोण असा सवाल आता निर्माण होत आहे.
अगदी धरण बांधकामापासुन काहिच अंतरावर या विद्युत प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे यामुळे यासाठी कोणतेही खोदकाम करताना मशीनरीच्या सहाय्यानेच करावेत असे नियम आहेत याशिवाय यासाठी तहसिलदार मोखाडा वनविभाग यांचीही परवानगी आवश्यक आहे मात्र याठीकाणी आजवर १० ते १२ वेळा ब्लास्ट झाले असून यासाठी किमान २ हजार स्फोटकाचा उपयोग झाल्याचा अंदाज आहे यावरून हा किती भयंकर प्रकार आहे याचा अंदाज येतो आहे मात्र धरणक्षेत्राच्या परीसरात चीतपाखरुलाही परवानगी नाकारणे अधिकारी,तसेच कित्येक गावाना रस्ता बनविण्यासाठी आडकाठी करणारा वनविभाग आणि एक ट्रोली रेतीही घेवू न देणारा महसुल विभाग मात्र एवढे मोठे स्फोट आणि खोदकाम विनापरवानगी होत असताना ढाराढूर झोपतो कसा असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मुळात धरणाच्या शेजारी खुप गावे शेती आहे या स्फोटामुळे जर धरण फुटले तर मात्र मोठी हानी पोहचु शकते याबाबत विद्युत प्रकल्पाचे ठेकेदार स्फोट झाल्याची घटना नाकारत आहेत मात्र शेजारच्या अजनुप दापुर गावचे सरपंच शांताराम भगत आणि सदस्य अनंता वारे यांनी सांगितले कि या स्फोटा दरम्यान आम्हाला दोन दोन तास येथून प्रवास नाकारला जायचा आम्हाला कसलीही माहिती दिली जात नव्हती याशिवाय गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही आमच्या गावासाठी रस्त्याची मागणी करीत आहोत मात्र आजवर साधी परवानगी मिळत नाही मग या मोठ्या प्रकल्पाना परवानग्या कशा मिळतात असा सवाल यांनी केला आहे यामुळे आता विनापरवाना याभागात स्फोट घडवून आणलेल्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

” याभागातील स्फोटामुळे आसपासच्या गावाना धोका निर्माण झाला आहे याशिवाय मी फोरेस्ट आणि तहसीलदारांशी बोललो तर कसलीही परवानगी यासाठी देण्यात आलेली नाही यामुळे घरकुल बांधकामासाठी थोडीशी रेती वापरली तर कारवाई करणारा महसूल विभाग आणि दोन चार फाट्या गोळा केले तर आमच्या आदिवासींवर कारवाई करणारा वनविभाग या ठेकेदारावर कारवाई करील का ?
प्रदिप वाघ
उपसभापती,पं स मोखाडा

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर