ji24news

,हिंदूह्रदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्ताने पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले…

,हिंदूह्रदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्ताने पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले…

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )जव्हार :(सोमनाथ टोकरे )

उद्धव बा.ठाकरे शिवसेनेच्या वतीने जव्हार जव्हार शहरात गांधी चौकात हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जव्हार तालुक्यामध्ये दिनांक २३ जानेवारी रोजी हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने जव्हार शहरात देखील गांधी चौक,जव्हार यशवंत नगर,मोर्चा परिसर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने प्रचंड जयघोषात बाळासाहेबांस जाहीर अभिवादनाचा कार्यक्रम करण्यांत आला. कार्यक्रमांमध्ये प्रथम गांधी चौकात, तद्नंतर पतंगशहा कुटीर रुग्णालयात रुग्णांना व गरोदर मातांना बिस्किटे,फळं वाटप करण्यांत आली. तसेच रुग्न व डिलिव्हरी दरम्यानची ब्लड बँकेला रक्ताचा तुटवडा निर्माण होतों ही अडचण लक्षात घेता रक्तदान शिबीराचा कार्यक्रम येत्या दोन दिवसांतच आयोजित करण्यांत आला आहे.तसेच युवकांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी सिझन स्पोर्ट क्रिकेटचे सामने तालुका अंतर्गत या निमित्ताने ठेवलेले आहेत २३ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत या सप्ताहात हा कार्यक्रम सुरू राहील. जव्हार तालुक्यातील अनेक ज्येष्ठ मान्यवर शिवसैनिक बांधव एक दिलाने,एक निष्ठेने अभिवादनास हजर होते.’ आम्ही सर्व समस्त शिवसैनिक, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, मुस्लिम सेलचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभें आहोत असा निर्धार या निमित्ताने सर्वानीच व्यक्त केला ‘.जव्हार शहर व तालुक्यामध्ये शिवसेनेची कोणत्याही प्रकारे अशी पडझड झालेले नाही. सर्व शिवसैनिक बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसार सोबत…एकसाथच आहोत.असा नारा देत आमची निष्ठा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी शिवसैनिक म्हणून आहे, आम्हीं बाळासाहेबांची दिलेली शिकवण,बाळासाहेबांचा ज्वलंत विचार, खेड्यापाड्यांमध्ये पोहचणार आहोंत सर्व एकनिष्ठ शिवसैनिक हे विचार पुढे घेऊन जाणार आहेत. आजच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे, ( शिवसेना गट ) राजूभाई अंभिरे, तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, जव्हार शहर प्रमुख परेश पटेल, महिला आघाडीच्या तालुका समन्वयक,तथा मा.नगराध्यक्षा सौ.कांचनमालाताई चुंबळे यांच्या शुभहस्ते वंदनीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचे महापूजन करण्यांत आले.उपतालुकाप्रमुख तथा उपसभापती चंद्रकांत रंधा, सिताराम पागी, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाशजी चुंबळे सर,ॲंड प्रसन्न भोईर, चित्रांगण घोलप,हरी बोरसे, प्रशांत वनमाळी,इरफान शेख,अरषद कोतवाल,शकीलभाई कुणमाळी, महिला आघाडीच्या तालुका संघटक संगीता जाधव, शहर संघटक कल्पना आयरे,सुधाकर वळे तसेच तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांनी व असंख्य शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या चरणीं विनम्र अभिवादन केलें.
याप्रसंगी गांधी चौकात चित्रांगण घोलप,प्रकाश चुंबळे सर व राजू अंभिरे यांनी शिवसेना व बाळासाहेबांप्रतीं आपलीं प्रखर मनोगतें व्यक्त केली.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर