
जिल्हा परिषद शाळा खोस्ते व ग्रामपंचायत खोस्ते प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात.. .
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील दरवर्षी प्रमाणे या वर्षी जिल्हा परिषद शाळा खोस्ते प्रजासत्ताक दिन साजरा केला . कार्यक्रमाला स्थानीय शिक्षक वर्ग सरपंच मॅडम ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ बालवाडी सेविका इतर महिला वर्ग उपस्थित होते , सूचनेप्रमाणे सर्व विद्यार्थी सकाळी ८ वाजता मैदानात उपस्थित होते . प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील लहान मुलांनी भाषण कलागुण सादर केले. 7:30 वाजता परिसरातून सुंदर मिरवणूक काढण्यात आली . शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपले सुंदर विचार मांडले .
त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या नेत्यांची लहान मुलांनी भाषण विद्यार्थ्यांनी सादर केले. हा कार्यक्रम गायन, पठण, भाषण इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला होता. सरपंच मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमचा शेवट केला . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय नीलम भास्कर भोये (सरपंच) ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, मुख्याध्यापक व सहशिक्षक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थी वर्ग व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Total Users : 10829