
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनामुळे कार्यालयातील कामे व रोजगार हमीची कामे ठप्प……..
जोहार इंडिया न्यूज 24 news(प्रतिनिधी )-दीपक भोये विक्रमगड.
विक्रमगड पंचायत समिती कार्यालयातील रोहयो संपूर्ण कामे ठप्प…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ,कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक ,क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा पालघर यांच्या वतीने विविध मागण्या साठी आंदोलन सुरू करण्यात आले होते विक्रमगड पंचायत समितीतील सर्व कामे ठप्प पडलेली आहे आंदोलनासंबंधाने संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना यापूर्वीच निवेदन दिले आहेत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत मागील 10 ते 12 वर्षापासून प्रामाणिकपणे अखंडित कामे करीत आहोत वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असून कामे वेळेवर पूर्ण करीत आहोत कोविड- 19 या महामारीच्या काळात सुद्धा नियमित कार्यरत राहून स्वतःच्या जीवाची परवा न करता कोणत्याही शासकीय सुविधा नसताना सुद्धा रोजगार हमी योजना अंतर्गत योजनांचे कामे करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे असे असताना सुद्धा मागील तीन ते चार वर्षापासून कंत्राटी कर्मचारी यांना कोणतेही मानधन वाढ झालेली नाही मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या मध्यप्रदेश शासनाच्या प्रमाणे वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी व इतर दिनांक 1 फेब्रुवारी रोजी विक्रमगड पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीचे सर्व कामे जागेवर थांबलेली आहेत. रोजगार हमी योजनेतील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने रोजगार हमी योजनेची विक्रमगड तालुक्यातील सर्व कामे ठप्प पडलेली आहेत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेचा मोठा हातभार लागलेला आहे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुळे गाव खेड्यातील रोजगार हमी कामाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचा उदरनिर्वाहाचे साधन तसेच गावात विविध विकास कामे करून गाव विकास साधने या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून सुद्धा त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करते ही खेदाची बाब आहे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रोजगार हमी योजनेचा बोजवारा उडत आहे.

Total Users : 10829