
खुडेद पैकी घोडीचापाडा येथील पेसा प्रस्तावावर सही करण्यास टाळाटाळ …..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )- दीपक भोये विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खुडेद पैकी घोडीचापाडा येथील ग्रामस्थांनी दि.१९/०१/२०२३ रोजी आमच्या पाड्याचा पेसा ठराव संमत करून प्रस्तावावर ग्रामसेवक,सरपंच यांच्या सहीसाठी प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालय खुडेद या ठिकाणी ठेवून १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही या प्रस्तावावर अजून पर्यंत सरपंच ,ग्रामसेवक यांची सही झालेली नाही.याबाबत घोडीचापाडा येथील आम्ही ग्रामस्थांनी चौकशी केली असता ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांची सहमती घेतल्याशिवाय तसेच सदरचा प्रस्ताव खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पाड्यांच्या ग्रामस्थांसमोर ग्रामसभेत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि नंतर ग्रामसेवक यांनी सदर प्रस्तावावर सही करणार असल्याचे सांगितले.याबाबत सरपंच लहू नडगे यांच्याशी दोन वेळा मोबाईल द्वारे संपर्क साधून चौकशी केली असता माझा तसेच ग्रामपंचायतचे आमच्या पूर्ण बॉडीचा कोणत्याही प्रकारचा विरोध,तक्रार वा हरकत नाही असेच त्यांनी सांगितले.मात्र ग्रामसेवक यांना दोन वेळा मोबाईल द्वारे संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.तसेच मंगळवार दि.७/०२/२०२३ रोजी सकाळी १०:३० ते १२:१५ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ग्रामसेवक यांची वाट पाहिली परंतु ते आले नाहीत आणि त्यांना फोन केला परंतु फोन उचलला नाही. याचा अर्थ काय समजावा.ग्रामसेवक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या प्रस्तावास विरोध करीत आहेत की, खुडेद मधील स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबावाखाली येऊन प्रस्तावावर सही करण्यास टाळाटाळ करीत आहेत की , पेसा ठराव पास झाल्यानंतर पेसा निधी विभागला जाईल यासाठी सही करण्यास टाळाटाळ करीत असतील.काहीही असले तरी ग्रामसेवक आम्हास सहकार्य करीत नाहीत हे सिद्ध होत आहे.
सादर.मा.जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद कार्यालय पालघर, मा.उपविभागीय अधिकारी,उपविभागीय अधिकारी कार्यालय विक्रमगड ,मा. सुनिलजी भुसारा
आमदार(विक्रमगड विधानसभा मतदार संघ),
मा. डॉ.विजयकुमारजी गावित आदिवासी विकास मंत्री – यांना निवेदन देण्यात येणार आहे
शैलेश कामडी – ग्रा. पं.सदय, किसन कामडी.गणेश गावित.
सुदाम कामडी.ग्रामस्थ
भारत पाटारा – कार्यकर्ता (धरतरी फाऊंडेशन) गावातील ग्रामस्थ कृपया सदरचे विषयाबाबत आपण विशेष लक्ष देऊन आम्हाला योग्य निर्णय घेऊन न्याय मिळावा निवेदन देण्यात आले आहे.
Total Users : 10829