ji24news

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची विक्रमी विक्री…

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची विक्रमी विक्री…

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड : ( जिल्हा – वर्धा)
संमेलन स्थळी एकूण 286 पुस्तकांची व इतर वस्तूंची दुकाने थाटली होती. दिवसभर सर्वच दुकानांतून खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. पुस्तकांसोबतच इतरही वस्तूंची विक्री होत आहे.
स्टोरीटेल मराठी, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठीची मराठी मंडळे आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचावे म्हणून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने धरणे धरून बसली होती. ३ दिवसांच्या संमेलनात २ कोटी ८९ लक्ष रुपयांची एकूण पुस्तके विक्रीला गेल्याचे आयोजक प्रदीप दाते यांच्याकडून समजते.

स्टोरीटेलने मराठीतील पाच हजारांहून अधिक सर्वोत्तम पुस्तके ऑडिओ स्वरूपात मोबाईलवर उपलब्ध करून देऊन मराठी भाषा संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यामुळे मराठी भाषिक आपल्या स्मार्टफोनवर जगात कुठेही, कितीही आणि कधीही मराठी भाषा ऐकू शकतात. स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ यावेळी म्हणाले, ‘९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन साजरे करण्यासाठी स्टोरीटेलच्या माध्यमातून आम्ही विशेष योजना घेऊन येत आहोत. अवघ्या पाचशे रुपये वार्षिक वर्गणीत पाच हजारांहून अधिक मराठी ऑडिओबुक्सचा खजिना या दरम्यान साहित्यप्रेमी, दर्दी रसिक अनुभवू शकतील.”

मराठी भाषा विभागाने पत्रपेटी व मजकूर लिहिलेली पत्रे ठेवली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे कसे योग्य आहे हे सांगणारी उदाहरणे लिहून पत्रे तयार ठेवली आहेत. राष्ट्रपतींचा पत्ता असलेल्या या पत्रावर प्रेषक म्हणून आपापले नाव लिहून पत्र पेटीत टाकण्यात आले.

विवेक प्रकाशनाच्या पद्मश्री रमेश पतंगे लिखित स संविधानाचा पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. कित्येक पालक आपल्या मुलांसाठी संविधान घेऊन जात आहेत. हे सर्व शालेय वयातच मुलांना शिकवायला हवे अशी प्रतिक्रिया एका बाबांनी यावेळी दिली. इंडस बुक सोर्सचे शांताराम म्हणाले,’कोरोना महामारीनंतर धार्मिक पुस्तकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजही वाचकांची पसंती धार्मिक पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसून येते.

तृणधान्यांचे वर्ष जाहीर झाल्याने बाजरी आणि नाचणीचे पदार्थ, पापड, कुरडया मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. स्थानिक काळा गुळ व नाचणीचे विविध आकारातले पापड वाचकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच वर्धा येथील खादी ग्रामोद्योग सुती पिशव्या, सद्य, पर्सेस व अन्य सुती वस्तू विक्रीला ठेवले आहेत. पैकी साड्या महिलावर्गाच्या पसंतीस उतरल्या आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर