
जगजीवन राम माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थी- शिक्षक -पालक मेळावा संपन्न”
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड (जिल्हा – वर्धा )
दलित मित्र दिवंगत ऍड. शंकररावजी सोनवणे साहेब संस्थापक अध्यक्ष ठक्कर बाप्पा सेवा समाज, वर्धा तथा माझी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त “विद्यार्थी -शिक्षक- पालक मेळावा” चे आयोजन नवभारत अध्यापक विद्यालय वर्धा, जगजीवनराव माध्यमिक विद्यालय वर्धा तसेच नवभारत प्राथमिक अभ्यास शाळा, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
सदर विद्यार्थी -शिक्षक- पालक मेळाव्यास अध्यक्ष म्हणून मा. अनिलजी सोनवणे अध्यक्ष ठक्करवापासेवा समाज, वर्धा प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून माननीय श्री भाऊसाहेब गावंडे माजी शिक्षण सहसंचालक, प्रा. डॉ. एम. एल. कासारे संचालक ठक्करबाप्पा सेवा समाज, वर्धा मा.डॉ. मंगेशजी घोगरे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा मा. लक्ष्मीनारायण सोनवणे सचिव, ठक्करबाप्पा सेवा समाज, वर्धा तथा माजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा, मा. श्री नयनजी सोनवणे सहसचिव ठक्कर बाप्पा सेवा समाज, वर्धा, श्री मधुकर जी वानखेडे संचालक ठक्करबाप्पा सेवा समाज वर्धा मंचावर उपस्थित होते.
सदर महोत्सवाची सुरुवात दिवंगत शंकररावजी सोनवणे साहेब यांच्या प्रतिमेस माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन तसेच प्राध्यापक कापसे सर व गीत मंच द्वारे स्वागत गीत गाऊन करण्यात आले.
देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी व प्रगत समाज निर्माण करण्यासाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे, गरीब समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शंकराव सोनवणे साहेबांनी शिक्षक निर्माण करणारे अध्यापक विद्यालय व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी माध्यमिक विद्यालय तसेच प्राथमिक शाळा स्थापन केल्या, मराठी माध्यमाच्या शाळांचा संघर्षाचा काळ आहे असे असताना या संघर्षातून मार्ग काढत या शाळा टिकून आहे याचे सर्व श्रेय शिक्षकांना नक्की द्यावे लागेल ज्यांच्या प्रेरणेने या परिसरात ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे त्यांच्या विचारांना माझे मनापासून अभिवादन असे विचार डॉक्टर मंगेश घोगरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकता यावे या उदात्त हेतूने साहेबांनी शाळा काढल्या शिक्षकांनीही मोठ्या परिश्रमाने इथे पिढ्या घडविल्या हे बघून साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले असे वाटते असे विचार प्रमुख फक्त डॉ. कासारे यांनी व्यक्त केले
आजच्या काळात पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून प्रत्यक्ष अनुभवातून आणि कृतीतून काही कौशल्य विकसित करून त्याचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करून घ्यायचा आहे. “विद्यार्थ्यांनो तुमच्या मध्येच सूर्य आहे त्याचा शोध घ्या स्वयंप्रकाशित व्हा स्वतःची प्रगती करणे हे केवळ तुमच्याच हातात आहे”, शक्य तेवढे मोबाईल पासून दूर राहा फक्त काही शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठीच त्याचा उपयोग करा. विद्यार्थी आपल्या मातृभाषेतूनच सहजपणे शिकत असतो म्हणून विद्यार्थ्यांना मराठी मराठी माध्यमातूनच शिक्षण देणे गरजेचे आहे जेणेकरून विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेतील.”विद्यार्थ्यांनो शिक्षण हे परिस आहे, प्रत्येकाने या परिसाचा उपयोग करून स्वतःचा विकास करून घ्यावा” असे मार्मिक विचार प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भाऊसाहेब गावंडे माझी शिक्षण सहसंचालक यांनी व्यक्त केले.
मेळाव्याचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. अनिल जी सोनवणे यांनी, विद्यालयामध्ये शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालविल्या जात असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर मेळाव्याप्रसंगी विद्यालयाच्या सम्राट अशोका ग्रुपच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जांभोरेला उपस्थित राहून जिल्ह्याचे नेतृत्व केल्याबद्दल विद्यालयातील स्काऊट रोवर्स यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला आदर्श विद्यार्थी कुमारी तन्वी सायंकाळ इयत्ता 10 वी व कुमारी मेघा इंगोले वर्ग 10वा यांचा यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉर्ड 2022 मिळाल्याबद्दल विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री रमेश निमसडकर, स्काऊट मास्टर म्हणून उत्तम कामगिरी बजावणारे शिक्षक श्री राजहंस जंगले तर शरद पवार दंत महाविद्यालय तर्फे आयोजित बेस्ट टीचर परफॉर्मन्स अवार्ड मिळाल्याबद्दल श्री प्रभाकर उईके यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठक्कर बाप्पा सेवा समाज संस्थेचे सचिव लक्ष्मीनारायण सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन अभय मकेश्वर यांच्या नेतृत्वात कु. साची बावणे हिने केले तर उपस्थितांचे आभार मु. प्रशांत नागपुरे यांनी मानले. सदर विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्यास विद्यार्थी शिक्षक पालक व संस्थेशी नाळ जुळलेले अनेक ज्येष्ठ लोक मेळाव्यास उपस्थित होते.
Total Users : 10829