
ग्रुप.ग्रामपंचायत केव अंतर्गत मौजे केव येथे श्रीफळ वाढवून जलजीवन योजनेच्या कामाचा शुभारंभ…….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आज रोजी मौजे केव येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे उद्दघाटन सरपंच श्री.विलास घाटल साहेब व माजी उपसभापती व पं.स. सदस्य सौ नम्रता नरेश गोवारी मॅडम यांच्या शुभ हस्ते पार पडले.यावेळी प्रमुख उपस्थिति उपसरपंच कु.कुणाल पाटिल साहेब, ग्रा.पं स.श्री.अशोक गोवारी,श्री.नरेश गोवारी, कु.ममता गोवारी, गणेश गोवारी, ग्रामसेवक श्री.गणेश मंडळ, माजी सरपंच मधुकर गांगडे, ग्रामस्थ नकुल गांगडे,गजानन रावते,रविंद्र गांगडे,एकनाथ रावते, योगेश नाईक सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. देहर्जे नदीपात्रात बाराही महीने पाणी असलेल्या ठिकाणी भूमिपूजन करून विहीर खोदन्याचे काम सुरु केल्याने या ठिकाणी मौजे केव गाव अंतर्गत बारा पाड्यांतील २५०० ते ३०००लोकवस्ती आलेल्या कुटुबांचा अनेक वर्षापासून असलेला पाणी टंचाईचा प्रश्न सुटला.असे मत उपसभापति सौ. नम्रता गोवारी यांनी व्यक्त केले.उपस्थित ग्रामस्थानी सर्व पदाधिकाऱ्या चे आभार मानले.

Total Users : 10829