
मोर्हांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा समाधान कारक –
पालघर प्रतिनिधी – सौरभ कामडी.
मोखाडा- आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपले अन्न, वस्र, निवारा, ह्या मूलभूत गरजा आहेत तसेच वैद्यकीय ही एक आपल्या आरोग्यासाठी जीवनावश्यक गरज आहे असे सांगायला हरकत नाही. जसे आपण आपले चांगले आरोग्य ठेवण्यासाठी तसेच चांगल्या पद्धतीने जीवन सुखी ठेवण्यासाठी आपण जीवनाला महत्त्व देत असतो आणि म्हणून त्यासाठी आपण आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण विविध ठिकाणी दवाखान्यात जाऊन विविध वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा सला घेत असतो. अशातच प्रकारे
आज मोखाडा तालुक्यातील मोर्हांडा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपसभापती श्री प्रदीप वाघ यांनी भेट दिली, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी सुविधा ची माहिती घेतली, औषध साठा, तपासणी सुविधा समाधान कारक दिसल्याने हा आदर्श इतर वैद्यकीय अधिकारी यांनी घ्यावा असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ देसले, पत्रकार हनिफ शेख, पवार सर, विठ्ठल गोडे, नंदकुमार वाघ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Total Users : 10829