
नवभारत अध्यापक विद्यालय व जगजीवनराम माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
प्रा.दिनेश राठोड(जी 24 न्यूज)
जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
19 फेब्रुवारी 2023 रोजी नवभारत अध्यापक विद्यालय व जगजीवनराम माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यापऺण ठक्करबाप्पा सेवा समाज वर्धा चे सचिव तथा माजी शिक्षणाधिकारी माननीय श्री. लक्ष्मीनारायणजी सोनवणे साहेब यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन नवभारत अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य अभय मकेश्वर यांनी केले. सदर कार्यक्रमास अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सुनील गावंडे उपस्थित होते.तसेच जगजीवन माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश निमसडकर, सर्व अध्यापकाचार्य व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Total Users : 10829