
वनव्याने लागलेल्या आगीत घर बेचिराख…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मांगरुळ येथील दिनांक 16/2/2023ठीक दुपारी1-00वाजता लागलेल्या वणव्यात मांगरुळ पैकी फणसपाडा गावातील श्री चिंतामण हरी बरफ या ग्रामस्थ पूर्ण घर जळाले आहे ,त्यात त्याचे आधार कार्ड इतर सर्व पेपर पूर्णपणे जळाले ,तांदूळ,30,000रुपये , 2.50किंटल भात असे भरपूर आवश्यक असनाऱ्या वस्तू जाळून नष्ट झाल्या आहेत. आगीत पूर्णपणे बेचिराक झाले आहे. ही आग वनव्याने लागलेली असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने त्याचा पंचनामा केला आहे. त्या पंचनामेची लवकरात लवकर दखल घेऊन शासनाने मदत करावी सदर ग्रामस्थांचे मागणी आहे.

Total Users : 10829