ji24news

लाच घेतला दारुचा खंबा! वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक….

लाच घेतला दारुचा खंबा! वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक……

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड
सरकारी कामात लाच म्हणून अनेकदा रोख रक्कमेची मागणी केली जाते. काही वेळेस रोख रक्कमेसोबत भेट वस्तूदेखील मागितली जाते. पालघरमध्ये लाच म्हणून रोख रक्कमेसोबत दारूचा खंबा मागणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विजय लक्ष्मण धुरी आणि विष्णू पोपट सांगळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पालघर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
एका बांधकाम व्यवसायिकाकडे मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीचे एक प्रकरण वनविभाग वाडा येथे एनए करिता ‘ना हरकत’ दाखला मिळण्याबाबत काम प्रलंबित होते. यासाठी पंचनामा झाला नव्हता. पंचनामा करण्यासाठी या आरोपींनी दहा हजार रुपये रोख आणि दारूचा खंबा लाच म्हणून मागितला होता. दारूचा खंबा तात्काळ स्वरुपात द्यावा, असेही आरोपींनी तक्रारदाराकडे मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेत याबाबत माहिती दिली. त्यानंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यावेळी आरोपी लक्ष्मण धुरी यांनी वाडा येथील वनविभागाच्या शासकीय कार्यालयात एक दारुचा खंबा स्विकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत अधिकाऱ्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर