
वर्धा जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाच्या माध्यमातून भरारी पथके व बैठे पथकाची कारवाई….
ji 24 न्यूज – जिल्हा प्रतिनिधी वर्धा प्रा.दिनेश राठोड.
वर्धा : जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेकरिता कॉपी मुक्त अभियानात पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलेल्या सुचनांनुसार परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अधिकार्यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी केली.
दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील संत साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयातील बैठक व्यवस्था व अन्य बाबी यामुळे हे केंद्र रद्द करण्याची शिफारस बोर्डाकडे करण्यात आली तर यशवंत विद्यालय वायगाव निपाणी येथील बाह्य घटकाचा उपद्रव व गैरशिस्तीच्या प्रकारामुळे केंद्रसंचालाकाना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विकास विद्यालय गिरड येथे एका कॉपी बहाद्दराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.वर्धा जिल्ह्यामध्ये 55 केंद्रावर परीक्षा सुरू झाली. अतिसंवेदनशील व संवेदनशील 44 केंद्रावर बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलिस।अधीक्षकांनीही
भरारी पथक म्हणून परीक्षा केंद्रास भेटी दिल्या जिल्ह्यामध्ये 8 विभाग प्रमुखांची 8 विशेष भरारी पथके तसेच विभागीय मंडळानी नियुक्त केलेले 6 भरारी पथके यांनी वेगवेगळ्या केंद्रास भेटी दिल्या. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांचा अहवालानुसार संत साईबाबा क. मा. वि, बुरकोनी येथील बैठक व्यवस्था व अन्य बाबी यामुळे हे केंद्र रद्द करण्याची शिफारस बोर्डाकडे करण्यात आली आहे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या अहवालानुसार यशवंत विद्यालय वायगाव निपाणी येथील बाह्य घटकाचा उपद्रव व गैरशिस्तीच्या प्रकारामुळे केंद्र संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांच्या भरारी पथकाने विकास विद्यालय, गिरड येथे एका कॉपीबहाद्दराला रंगेहाथ पकडले.बाकी ईतर केंद्रावरील परीक्षा सुरळीत चालू होती.
Total Users : 10829