ji24news

राज्यात पहिल्यांदा पाच महिला बनणार लालपरीच्या चालक.

राज्यात पहिल्यांदा पाच महिला बनणार लालपरीच्या चालक…

प्रा.दिनेश राठोड(ji 24 news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच लालपरीचे स्टिअरिंग महिलांच्या हाती येणार आहे. जिल्ह्यातील पाच महिला लवकरच लालपरीचे सारथ्य करणार आहेत.
लालपरी हा राज्यातल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लालपरीची सुरुवात झाल्यापासून गरजेप्रमाणे एसटी बसमध्ये अनेक बदल होत गेले. आता असाच एक बदल आपल्याला पाहावयास मिळणार आहे. सन २०१९ मध्ये पहिल्यांदा ‘महिला चालक’अशा पदाची जाहिरात देण्यात आली होती. राज्यातील २१ विभागात सुमारे ६०० च्या वर महिला चालकांचे अर्ज प्राप्त झाले होते. वर्धा जिल्ह्यात एसटी महामंडळाकडे चालक पदासाठी १० अर्ज दाखल झाले होते.मात्र, एक महिला नागपूर येथे नोकरीला लागली. दोन महिला प्रशिक्षण सोडून गेल्या, तर दोन महिलांना इतरत्र नोकरी लागली. आता पाच महिलांना चालक प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच महिलांच्या हाती बसचे स्टिअरिंग येणार असल्याची माहिती आहे.
पहिल्यांदाच महिलांच्या हाती कमान
एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांच्या हाती बसचे स्टिअरिंग येणार आहे. शरीरावर खाकी, हातात स्टिअरिंग आणि चेहऱ्यावर अभिमानाची भावना घेऊन बस चालविणाऱ्या महिलांची सर्वत्र चर्चा होत आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर