ji24news

ग्रामस्थांनी दिले शाळेला वाद्य साहित्य…

ग्रामस्थांनी दिले शाळेला वाद्य साहित्य….
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – शाळा म्हटले की एक मंदिरच आहे, असे सांगायला वावगे जाणार नाही. कारण शाळेमधून खूप काही आपण शिकून आणि मोलाचे अनुभव घेत असतो आणि अश्या वेळी आपल्याला काही कारणास्तव विविध ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्ती मोलाचे मार्गदर्शन करतात तसेच काही भेट म्हणून वस्तू देऊन जातात.
अश्याच प्रकारे किनिस्ते येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थ व पालक श्री बाळकृष्ण शिंदे यांनी शाळे साठी वाद्य साहित्य भेट दिले आहे,ग्रामस्था कडुन स्वखर्चाने दिलेल्या या अनोख्या भेटी मुळे सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी शिंदे यांचे कौतुक केले आहे.
यावेळी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यां साठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामस्थ,पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी शाळेसाठी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच शाळेच्या दर्जा सुधारला जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया,पालक व शिक्षक यांचे नाते निर्माण झाले पाहिजे, माझ गाव व माझी शाळा या भावनेने काम केले तर नक्कीच आदर्श शाळा घडायला वेळ लागणार नाही असे हि श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले.
यावेळी श्री मंगेश दाते यांनी देखील मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावकरी नेहमीच शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, शिक्षकांना सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.तसेच किनिस्ते व वाकडपाडा केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेला हि श्री प्रदीप वाघ यांनी मार्गदर्शन केले,पोर्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत श्रीमती ढेरे यांनी शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते.
कार्यक्रमास श्री प्रदीप वाघ,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री चंद्रकांत दाते, केंद्र प्रमुख श्री नागु विरकर, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री संजय वाघ माजी सरपंच, श्री गणेश खादे ग्रामपंचायत सदस्य, श्री बाळकृष्ण शिंदे , श्रीमती दिपाली शिंदे,
मुख्याध्यापक श्री सुरेश हमरे, श्रीमती ढेरे व केंद्रातील सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर