ji24news

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त महा स्वच्छता मोहीम…..


डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त महा स्वच्छता मोहीम…..

ji24news.प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड
महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान म्हणून साजरा केला जात आहे.
या वेळी विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड,अलोंडा,मलवाडा, टेंभुर्णी मधील 274 श्री सदस्यांनी एकत्र येऊन हातात खराटा, फावडा, टिकाऊ, पंजा घेऊन विक्रमगड शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस स्टेशन, नगरपंचायत कार्यालय आदी शासकीय कार्यालयातील सर्व परिसराची रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करून प्लास्टिक, गवत, टाकाऊ कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.या प्रसंगी स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार, विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, विक्रमगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात तहसीलदार पवार म्हणाल्या की, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे कार्य शब्दात वर्णन न करण्या सारखे असून त्यांचे समाज कार्य देशात मोलाचे कार्य करत आहे. तर प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी स्वच्छता विषयक उपक्रम बाबत शुभेच्छा देताना सांगितले की, बैठकीच्या माध्यमातून बाह्य स्वच्छते बरोबर अंतर्मनाची स्वच्छता करून समाजकार्य घडवले जाते.
दरवर्षी प्रतिष्ठान मार्फत विविध उपक्रम राबविले जातात या बाबत त्यांनी प्रतिष्ठानचे व जमलेल्या शिस्तबद्ध दासांचे कौतुक केले. यावेळी विक्रमगड नगरपंचायती मार्फत सहकार्य मिळाले

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर