
गॅस दरवाढी विरोधात केंद्र सरकारला होळीचे भेट… .
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड ji24 news
केंद्र सरकारने 1 मार्च 2023 पासून घरगुती गॅस 50 रुपये व व्यवसायीक गॅस 150 रुपये दरवाढ केल्यामुळे जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या दरवाढीचा निषेध करण्यासाठी व वाढीव दर कमी करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी कडून तहसील कार्यालय विक्रमगड येथे तहसीलदार विक्रमगड चारुशीला पवार यांना निवेदन देण्यात आले. होळी सण दोन दिवसावर आलाय म्हणून केंद्र सरकारने ही होळीची भेट जनतेला दिली आहे का? असा टोला विक्रमगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम आळशी यांनी लगावला.
होळी सण तालुक्यात उत्साहात साजरा केला जातो. गोड पदार्थ होळीचा नैवेद्य असतो. सिलेंडरचे दर वाढल्यामुळे व तालुक्यातून मिळणारा रॉकेलचा पुरवठा बंद असल्याने गोड पदार्थ बनवायचे तरी कसे? असा प्रश्न सामान्य जनतेस पडला आहे . तरी ही गॅसची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे.
सदर निवेदन देताना शिष्टमंडळासोबत संजय भानुषाली ,जगन्नाथ चाबके, संजय वांगड, मधुकर चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Total Users : 10829