
हिंगणघाट येथे उत्साहात होळी साजरी…
प्रा.दिनेश राठोड (ji24News)जिल्हा प्रतिनिधी – वर्धा:
प्राचीन काळापासून दरी खोऱ्यात वावरणाऱ्या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीतून दिसून येतो होळी व रंगपंचमीच्या उत्सव प्रत्येक समाज वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, परंपरागत होळी सणाला आधुनिकतेचा मुलामा चढवून काहींनी त्याचे विकृतीकरण केले आहे
मात्र बंजारा समाजाची होळी साजरी करण्याची पद्धत अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी आपली प्राचीन परंपरा अजूनही जोपासली आहे. रंगबेरंगी पारंपरिक वेशभूषा करून स्त्री-पुरुष लहान-थोर होळी भोवती वर्तुळाकार करून नाचतात. तांड्यावर होळीचे रंग उधळले जातात. होळीच्या या गीतांना ‘ लेंगी गीत ‘ असे म्हणतात. होळी नंतरचा लेंगी महोत्सव ही एक सांस्कृतिक पर्वणी असते. डफाच्या तालावर ही पारंपरिक लेंगी गीत गात , नृत्य करीत बंजारा समाजाची होळी वैशिष्ट्यपूर्ण व उत्साहवर्धक असते. लेंगी गीतातून बंजारा समाजाच्या प्रथा रूढी व परंपरा या संस्कृतीचे दर्शन घडते हिंगणघाट येथे बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणावर वास्तवास आहे.
हिंगणघाट तांडा येथे बंजारा समाजाने हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत त्याचे अस्सलपण पण टिकवून ठेवले आहे. लोककलेचा सुंदर आविष्कार या निमित्ताने तांड्यावर पाहायला मिळतो. येथील लहान व्यक्ती पासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत उत्साहात सामील झालेले होते.
परंपरेने चालत आलेली लेंगी डफ नगारा अशा वाद्यावर चाललेला लोक समूहाचा नुत्यमय आविष्कार पारंपरिक, वेशभूषा, केशभूषा बंजारा समाजातील आगळेवेगळे आकर्षण ठरते, दरम्यान होळी गीताचे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे महिला व पुरुष सारेच हे गीत एकत्र गातात विशेषता महिला गीत गाताना एकरूप होऊन तन्मयतेने नाचू लागतात. होळीचे लोक संस्कृती च्या प्रवाहात रीतीरिवाचा मेळ घातला गेला आहे.यावेळी हिंगणघाट तांडा येथील शेकडो महिला पुरुष लेंगी गीता मध्ये सहभागी झाले होते, सर्वप्रथम हिंगणघाट तांड्याचे कारभारी श्री उल्हास राठोड तद्नंतर तांड्याचे नायक श्री बळीराम चव्हाण तद्नंतर तांड्याचे डायेसाणे श्री पवार सर यांच्या घरासमोर बंजारा लेंगी गीत गाऊन लेंगी गीतावर नाचून बंजारा लेंगी गीतांमध्ये महिला व पुरुष रंगून केल्याचे पहायला मिळत होत्या.याप्रसंगी डफ वादन प्रा.दिनेश राठोड यांनी केले
नृत्य व वादनाचा मनमुराद आंनद तांड्यातील सर्व बांधवांनी लुटला.

Total Users : 10829