ji24news

सालाबादाप्रमाणे मोखाडा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत हिरवे – घानवळच्या घानवळ गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा…

सालाबादाप्रमाणे मोखाडा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत हिरवे – घानवळच्या घानवळ गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा…

जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी

मोखाडा – मोखाडा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत हिरवे – घानवळच्या घानवळ गावाला या पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे वर्षीही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे सुरू झाले आहे.
एकीकडे आपण डिजिटल आणि आधुनिक भारताचे स्वप्न बघत असताना घानवळ गावचे नागरिक मात्र पाणी टंचाईच्या भीषण समस्येसोबत झगडत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवापर्यंत घानवळवासीय चांगले रस्ते,पाणी, रोजगार आणि आरोग्य सुविधा यांच्या प्रतीक्षेत आहेत. गावचे नागरिक,माता – भगिनी हंडाभर पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी दोन कि.मी.ची पायपीट करत असून विहिरींनी देखील पाण्याचा तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव दूषित पाणी प्यावे लागत आहे. घानवळ गावची पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडावण्यासाठी हिरवे – घानवळ ग्रुपग्रामपंचायतचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढाकार घेताना दिसून येत नाही.त्यामुळे ही पाणी टंचाई घानवळवासियांच्या पाचवीलाच पुजली आहे असेच म्हणावे लागेल.
आदिवासी भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी शासन प्रत्येक वर्षी लाखो – करोडोंचा निधी देत असताना हा निधी नक्की मुरतो कुठे ? हा प्रश्न यानिमित्ताने कायम अनुत्तरितच राहतो आहे. घानवळवासीय ही पाणी टंचाई कधी कायमची संपेल असा प्रश्न नागरिक ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाकडे विचारत आहे. आता हा संवेदनशील आणि मूलभूत प्रश्न प्रशासन कधी सोडणार आहे ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर