ji24news

जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी..

जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून जिल्ह्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी…

प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी वर्धा.

आज दिनांक १४ मार्च २०२३ रोजी संपूर्ण जिल्ह्यात मोर्चे निघाले वर्धा,आर्वी, देवळी,शेलू, आष्टी,समुद्रपूर,कारंजा आणि हिंगणघाटमध्ये आजपासून सर्व विभागातील सरकारी व निमसरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत.जुन्या पेन्शन योजनेबाबत जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी आज मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे.वर्धा, हिंगणघाट,आर्वी येथे कर्मचार्यांनी मोर्चा काढून निवेदन दिली, तहसील कार्यालयात बैठे आंदोलन केले. महाराष्ट्र सेवानिवृत्ती अधिनियम 1982 नुसार कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती.परंतु 2005 नंतर नियुक्त झालेले कर्मचारी या योजनेपासून वंचित होते. जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून होत आहे. परंतु सरकारी तिजोरीवर आर्थिक बोजा पडल्याने राज्याची आर्थिक स्थिती ढासळल्याचे कारण देत पेन्शन योजना पुन्हा सुरू होणार नसल्याचे सरकार सातत्याने स्पष्ट करत होते. लगेल्या वर्षभरात जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्यामुळे अनेक राज्ये राज्य कर्मचाऱ्यांकडून पेन्शनची मागणी करत आहेत.त्यात सर्व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत.
सोमवारी राज्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आंदोलनाबाबत सरकारशी चर्चा केली. मात्र बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी आज मंगळवारच्या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले असून वर्धा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जि.प. कार्यालयातून निघणारी ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठाकरे मार्केट, बजाज चौक, मुख्य टपाल कार्यालय मार्गे आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचेली.या मोर्चाचे नेतृत्व राज्य शासकीय-निमशासकीय संघटनेचे समन्वयक हरिश्चंद्र लोखंडे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीचे प्रदेशाध्यक्ष विजय कोंबे, जिल्हाध्यक्ष रामदास खेकरे,शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मारोती सयाम, जलसंपदा संघटनेचे ओंकार धावडे, हिवताप संघटनेचे विनोद भालतडक, जि.प. संघटनेचे प्रमोद आटेल आदींनी केले. , बाबाराव भोयर व इतर कर्मचारी उपस्थित होते .संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाजावर विपरित परिणाम होणार असून, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्याचाच परिणाम मार्च एडिंगच्या कामकाजावर होणार आहे.अशा स्थितीत कर्मचारी संपावर गेल्याने विकासकामांसह अन्य अत्यावश्यक योजनांवर परिणाम होणार आहे.

हिंगणघाट येथे सुद्धा शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती जिल्हा वर्धा शाखा हिंगणघाट यांनी पी.एफ.आर.डी.ए विधेयक रद्द करा व जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह इतर अठरा मागण्यासाठी तहसील कार्यालयाचे आवारात बेमुदत संप व आंदोलन करीत आहेत यावेळी हिंगणघाट उपविभागातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी श्री नरेश येथेकर व विपिन मस्के महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजू धात्रक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे श्री सतीश घोडे व अजय गावंडे सौ मायाताई चाफले सौ विहीर कर सौ उषाताई गावंडे स्वातंत्रता समता शिक्षक संघाचे श्री पुष्पराज झिलटे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे श्री पंढरी तडस शिक्षक भारती संघटनेचे श्री नरेश येडे प्रा.दिनेश राठोड श्री कमलाकर झाडे श्री देवेंद्र पादाडे श्री अतुल वडमलवार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे श्री गजानन भुते, जिल्हा कोषागार संघटनेचे श्री दीपक धाबरडे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे श्री गोपाल मांडवकर महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे श्री राजू कारवटकर ग्रामसेवक संघटनेचे श्री सुधीर राठोड नगरपालिका कर्मचारी संघटनेचे श्री विजय खोब्रागडे यांनी जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी आपले मनोगत व्यक्त केले व जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा निर्धार यावेळी केला संप आंदोलनात श्री अनिल बेंदूरकर प्रमोद पांडे सुनील आत्राम धनराज झाडे अनिल गायकवाड उमेश गौर,अपर्णा चोखांद्रे विद्या करपाते मोहन तलवटकर संध्या कु.मोगरे योगिता महाजन श्री ओमप्रशांत काटेखाये,प्रवीण झाडे संतोष चव्हाण मदन आडे श्री गजानन लोणावळे दिनेश मंडलकर हर्षकुमार डबले सुनील बमनोटे सारिका राऊत शुभांगी सीडाम जयश्री दवणे पुनम धात्रक रूपाली वानखेडे विनिता राठोड नीलिमा उरकडे दिनेश खैरे अंकेश शिरभाते मारुती जायभाय संजय उईके पंकज वाघमोडे आधी सहभागी झाले व त्यांनी सहकार्य केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर