ji24news

एकच मिशन जुनी पेन्शनच्या मुद्यावरून तीव्र आंदोलन…

एकच मिशन जुनी पेन्शनच्या मुद्यावरून तीव्र आंदोलन…
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा.

दिनांक 14/03/2023 पासून शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती जिल्हा वर्धा शाखा हिंगणघाट
उपविभागाच्या वतीने पी.एफ आर.डी.ए विधेयक रद्द करून एनपीएस योजना रद्द करावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह व इतर 18 मागण्यांसह तहसील कार्यालयाचे आवारात बेमुदत संप आंदोलन करीत आहेत आज दिनांक 16/03/2023 रोजी सदर समन्वय समितीच्या वतीने जनतेला संपाबाबत माहिती व्हावी व जनजागृती व्हावी या दृष्टीने हिंगणघाट शहरातील मुख्य मार्गाने महा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील राज्यसरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते ही रॅली तहसील कार्यालयातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याला पुष्पहार घालून व अभिवादन करून समोर मार्गक्रमण करीत विठोबा चौक मोहता चौक कारंजा चौक संत तुकडोजी महाराज चौकातून तहसील कार्यालयात आंदोलन स्थळी आली या ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचारी व शिक्षक पत्रकार उपस्थित होते यावेळी विदर्भ विकास पक्षाचे नेते श्री अनिल जवादे यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करीत शासकीय कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आपल्या पक्षाचे समर्थन जाहीर केले आंदोलन स्थळी उपविभागातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात बेमुदत संपात सहभागी झाले राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी श्री नरेश येथेकर महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजू धात्रक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे श्री सतीश घोडे श्री पद्माकर हांडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे श्री अजय गावंडे वसंत कापटे पंढरी तडस प्रेम भोजन कर अरविंद बागडे सौ विहीरकर उषाताई गावंडे स्वातंत्र समता शिक्षक संघाचे श्री पुष्पराज झिलटे शिक्षक भारती संघाचे श्री कमलाकर झाडे,प्रा.दिनेश राठोड,श्री नरेश येडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे श्री गजानन भुते मायाताई चाफले व राजू इखार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे श्री गोपाल मांडवकर महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे श्री राजू कारवटकर नगरपालिका कर्मचारी संघटनेचे विजय खोब्रागडे जुनी पेन्शन संघटनेचे सचिन शंभरकर समीर वाघमारे गजानन भोंग यांनी जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी आणि सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाबाबत संतप्त भावनेने आपले मनोगत व्यक्त केले व जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेणार नाही असा निर्धार यावेळी सर्व कर्मचारी संघटनांचे वतीने करण्यात आला संप आंदोलनात श्री अनिल बेदुरकर प्रमोद पांडे सुनील आत्राम धनराज झाडे अनिल गायकवाड अपर्णा चोखांद्रे विद्या करपाते संध्या मोगरे प्रा.शरद ढाले प्रा.श्री गजानन लोणावळे प्रा.प्रणाली कडू,छत्रपती दौलत्कार प्रा.स्मिता लाहोरे स.शिक्षक सौ.कल्पना मडावी श्री मोहन तलवटकर कु.योगिता महाजन श्री ओमकार मडावी ,विद्या करपाते संध्या मोगरे प्रवीण झाडे संतोष चव्हाण मदन माडे हर्षकुमार डबले सुनील पुनम धात्रक विनिता राठोड दिनेश खैरे संजय विखे पंकज वाघमोडे सुनील दांडेकर विशाल केदार आशिष ढेकणे वामन शेळके वैशाली लांजेवार पुष्पलता ढोके दिलीप झाडे सह मोठ्या संख्येत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर