
जव्हार शहराच्या ऐतिहासिक जुन्या राजवाड्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी आदिवासी महादेव कोळी समाजबांधवांनी हाती घेतली स्वच्छता मोहीम…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी.
जव्हार – दि.19 मार्च,जव्हार संस्थान जुना राजवाडा येथे राजवाडा परिसरात संस्थान कालीन अनेक जुन्या वास्तू आहेत. या जुन्या वस्तू तत्कालीन वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. किंबहुना या प्राचीन वास्तू जव्हार शहराच्या सौंदर्यात नक्कीच चार चांद लावून पर्यटकांना आजही आकर्षित करतात.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन राजे श्रीमंत फ्लाईट लेफ्टनंट यशवंतराव मार्तंडराव मुकणे महाराज यांनी 1948 ला संस्थान खालसा झाल्यावर सदर जुना राजवाडा व परिसर जव्हार नगर परिषद प्रशासन यांच्या कडे सुपुर्द केला.उपलब्ध नोंदी नुसार साधारणतः 200 ते 225 वर्षा पूर्वी याच परिसरात हे कोरीव लाकडी खांब, उत्तम कलाकुसरीच्या कमानी ,घडीव दगडात पाया, मुर्ती तयार करण्यात केल्या होत्या.तसेच दर्जेदार जुन्या पध्दतीचे वीट बांधकाम करण्यात आले होते.जे तत्कालीन स्थापत्य शैलीची साक्ष देतात. संस्थान काळात ते आता अनेक वर्षांपर्यंत कौलारू मंदिर, वास्तू चांगल्या स्थितीत होते ; पण दरम्यानच्या काळात दुर्लक्ष झाल्याने ते पडझड होऊन या प्राचीन ऐतिहासिक वास्तू व कलाकृतींची दुरावस्था झाली आहे. ही बाब आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या लक्षात येताच त्यांनी प्राचीन वास्तूंचा वारसा सुरक्षित राहून पुढील पिढ्यांपर्यंत पोहचावा म्हणून स्वछता मोहीम हाती घेतली . या स्वछता मोहीमेमुळे हा जुना राजवाडा अधिक सुंदर दिसत आहे.
हे समाज बांधव या स्वच्छतामोहिमेच्या माध्यमातून भविष्यात या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी नियोजन करत आहेत. या स्तुत्य उपक्रमामध्ये महादेव कोळी समाज उन्नती मंडळ – महाराष्ट्र व जव्हार संस्थानवर निस्सिम प्रेम असणारे सर्व आदिवासी युवक मंडळ, महिला कर्मचारी, शिक्षकवृंद यांनी सहभाग नोंदवला होता. ही स्वछता मोहीम हाती घेणाऱ्या आदिवासी समाजबांधवांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षात होत आहे.
Total Users : 10829