
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी आंदोलनावर ठाम….
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा – प्रतिनिधी वर्धा
दिवसभर घोषणाबाजी सुरू. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत कर्मचारी, शिक्षक संपावर गेले आहेत. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संकुलात कामगारांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
शनिवारी व आज ही वर्धा व कारंजा, आर्वी, आष्टी, हिंगणघाट, देवळी, सेलू, समुद्रपूर तहसील कार्यालय परिसरात कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले असून सुट्टीचा दिवस असूनही आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. कारंजा येथे कर्मचार्यांनी पेन्शनबाबत स्कीट सादर करून शासनाचे लक्ष वेधले, यात महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध घोषवाक्य लिहिलेले फलक दाखवून देण्यात आल्या घोषणा, पेन्शन पथनाट्यातून वेधले लक्ष
वर्धा आणि आष्टीमध्ये दिवसभर कार्यकर्त्यांनी तबला, पणती वाजवून भजन, भारूड सादर केले. तेच मिशन, जुन्या पेन्शनच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कर्मचारी गांधी टोपी घालून सहभागी झाल्या होत्या. न.प. कर्मचारी संघटनेत आंदोलनाबाबत संभ्रम पाहायला मिळाला. वरिष्ठांच्या माहितीवरून काही कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय काही कामगारांनी घेतला आहे. आंदोलनाचा परिणाम जिल्ह्याच्या आरोग्य सेवेवरही दिसून आला. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात काही कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
उपाय योजना कृती आराखडा
संपाचा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवर वाईट परिणाम होऊ नये, यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यासाठी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना आखण्यास सांगितले असून, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

Total Users : 10829