ji24news

श्रीमती रंजना जोशी यांनी केले मोहफुला पासुन विविध पौष्टिक पदार्थ .

श्रीमती रंजना जोशी यांनी केले मोहफुला पासुन विविध पौष्टिक पदार्थ .
*पालघर प्रतिनिधी – सौरभ काम डी ji24news.
मोखाडा – कला म्हटल्यावर मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनती शिवाय यश प्राप्त करता येत नाही आणि त्या यशा मधून विविध गोष्टी आपण प्राप्त करत असतो आणि आपल्याला त्यामधून योग्य पद्धतीने मोबदला मिळत राहतो तसेच या मेहनतीने आपण टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवत राहतो कधी लाकडी त्याच प्रमाणे कधी काही वस्तू पासून खाण्याचे पदार्थ सुद्धा योग्य रीतीने बनवत असतो अश्याच प्रकारे मोखाडा तालुक्यात उधळे वाकडपाडा ग्रामपंचायत मधील आदिवासी महिला सौ रंजना जोशी यांनी मोह फुला पासुन,चटणी,मणुका,लाडु तयार केले असुन हे पदार्थ खुप चविष्ट आहेत, शिवाय पौष्टिक आहार म्हणून देखील खाण्यासाठी उपयुक्त आहेत, तसेच त्यांनी नागली पासून देखिल विविध पदार्थ तयार केले आहेत,पापड,लोणचे असे पदार्थ देखील तयार करून विक्री करत आहेत.
रंजना जोशी ह्या खाद्यपदार्थ बरोबरच गवता पासून टोपली, टोपी , आकर्षक वस्तू तयार करतात,या वस्तु देखील त्यांनी विक्री साठी ठेवल्या आहेत.
श्रीमती जोशी ह्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सोबत घेऊन या सर्व वस्तू तयार करतात, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
श्री प्रदीप वाघ उपसभापती यांनी देखील जोशी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच पालघर सरस किंवा अन्य ठिकाणी आपन स्टॉल लावून हे पदार्थ जनतेला उपलब्ध करून दिले तर लोकांची मागणी वाढेल व आपल्या या व्यवसायाला चालना मिळेल अशी अपेक्षा श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली आहे.
सरपंच लता वारे, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलिस पाटील विठ्ठल गोडे यांनी देखील श्रीमती रंजना जोशी यांच्या या व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे.

आदिवासी महिला सौ रंजना जोशी यांनी गवता पासून विविध वस्तू, तसेच नागली मोहफुले या पासुन खुप छान पदार्थ तयार केले असुन.शासनाने आदिवासी महिलांच्या या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी.
श्री प्रदीप वाघ
उपसभापती पंचायत समिती मोखाडा

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर