
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रकाशजी निकम साहेब यांच्या हस्ते ISO प्रमाणपत्र वितरण
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड ji24news.
विक्रमगड – शाळा म्हटले की एक विद्यामंदिर या दृष्टी कोनातून बघितली जाते आणि आपण या विद्यामंदिरातून विविध प्रकारच्या गोष्टी शिकत असतो या ठिकाणी आपल्याला शिक्षक हे योग्य पद्धतीने शिक्षण देत असतात आणि तसेच या विद्यामंदिरात आपल्याला खूप काही गोष्टींची आवश्यकता असते म्हणून ती कमी पडले की आपण त्यांचे कुठे ना कुठे तरी त्याचे मिळवण्याचे प्रयत्न करत असतो किंवा आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी संस्था मदत करत असतात अश्याच प्रकारे आज दिनांक 18/3/20230रोजी जिल्हा परिषद शाळा पाचघर ,जिल्हा परिषद शाळा सावर्डे या दोन्ही पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक आसलेल्या मोखाडा तालुक्यातील किनिस्ते केंद्रातील अतिदुर्गम शाळा . पण शिक्षक आणि ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आज या दोन्ही शाळांना गुणवत्ता व व्यवस्थापन ISO 9001-2015 चे मांनांकन प्राप्त झाले . पाचघर ग्रामस्थानी आयोजित एका भव्य दिव्य कार्यक्रमात आज या दोन्ही शाळांना ISO प्रमाणपत्राचे वाटप पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रकाशजी निकम साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कुसुमताई झोले , मोखाडा तालुका उपसभापती मा. प्रदीप वाघ पंचायत समिती सदस्या श्रीमती आशाताई झूगरे, करोल पाचघर ग्रामपंचायत सरपंच श्री. नरेंद्र येले, काष्टी सावर्डे ग्रामपंचायत सरपंच बोटे व माजी सरपंच हनुमंत पादिर तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. कुलदीप जाधव साहेब , गट शिक्षणाधिकारी मा. अमोल जंगले साहेब , सामाजिक कार्यकर्ते, मिलिंद झोले तसेच किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख व शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . शाळेला मदत करणारे जाणीव सामाजिक संस्थेचे मनोज पांचाळ व ए एस के फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते . प्रदिपजी वाघ यांनी शाळा विकासा साठी ग्रामस्थांचे महत्व पटवून दिले तर अध्यक्षीय भाषणात निकम साहेबांनी आदिवासी समाजातील अंधश्रद्धा आडानिपणा दुर करून शिक्षणाचे महत्व हे आपल्या आदिवासी भाषण शैलीतून उपस्थित ग्रामस्थांना पटवून दिले , जिल्हापरिषद शाळांचा दर्जा सुधारणेसाठी किनिस्ते केंद्रातील शाळा कोचाळे , पाचघर , सावर्डे या ISO शाळांचा आदर्श तालुका आणि जिल्ह्यातील इत्तर शाळांनी घ्यावा असे प्रतिपादन मा. अध्यक्ष यांनी केले.
Total Users : 10829