
संपकाळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री, पगारातून 1200 कोटींची कपात, 17 लाख कर्मचाऱ्यांना फटका….
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा…
सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा संपाच्या काळातील सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळं संपाच्या काळातील त्यांचे वेतन कपात केले जाणार आहे.
जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करा, या मागणीसाठी संप (Strike) करणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना राज्य शासनानं दणका दिला आहे. संपाच्या काळातील सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन (Salary) कापले जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांच्या पगारातून सुमारे 1200 कोटी रुपयांची कपात होणार आहे.
दरम्यान, याबाबत कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आदेशात बदल करण्यासाठी पत्र दिले आहे. काटकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली नाही. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च ते 20 मार्च याकाळात संप केला होता. या सात कालावधीत संपात सहभागी झालेल्या कर्मचारी, शिक्षकांचा पगार कापला जाणार आहे.
Total Users : 10829