ji24news

खासदार राहुल गांधींसाठी व वाढती महागाई काँग्रेस उतरली रस्त्यावर..

खासदार राहुल गांधींसाठी व वाढती महागाई काँग्रेस उतरली रस्त्यावर…

दीपक भोये विक्रमगड ji24news.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने व पालघर जिल्हा काँग्रेसने सूचित केल्याप्रमाणे बुधवार दिनांक 29 मार्च रोजी केंद्र सरकारच्या विरोधात धिक्कार व निदर्शने विक्रमगड तालुका काँग्रेस तर्फे करण्यात आली.
नुकतीच काँग्रेस पक्षाचे खासदार तथा ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याच्या निषेधार्थ विक्रमगड शहरातील बाजारपेठेत रत्यावर हा कार्यक्रम करण्यात आला.
या वेळी वाढती महागाई ,इंधन दरवाढ, गॅसच्या वाढत्या किमती, शिधापत्रिका धारकांना मिळणारे निळे रॉकेल रद्द केले ,शेतकरी वर्गाची परवड अनेक विषयावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले .
2014 ते 2019 या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीत दिलेले आश्वासन याची पूर्तता न झाल्याने सर्वसामान्य जनता त्रासली आहे. त्याचे काहीही सुयर -सुतक केंद्र सरकारला राहिले नाही .असे परखड विचार विक्रमगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम आळशी यांनी आपल्या भाषणात मांडले.
राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी त्यांना त्वरित परत बहाल करावी म्हणून राष्ट्रपती यांना विक्रमगड तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अशोक पटेल ,बबन गायकवाड ,कृष्णा साठे ,भास्कर डबका ,शांताराम रहाणे, जितेंद्र प्रभू, अरुण शेलका ,सखाराम जाधव ,रवींद्र ठाकूर, ज्योत्स्ना महाले, पांडुरंग पाटील व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर