ji24news

राज्यातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्थळ निश्चित,,,

राज्यातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्थळ निश्चित…..

प्रा. दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी-वर्धा….

वर्धा :अर्थसंकल्पीयअधिवेशनात
घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील अकरा जिल्ह्यातील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्थळनिश्चिती करण्यात आली आहे. पालघर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, वाशीम, जालना, बुलढाणा, अहमदनगर, अंबरनाथ, भंडारा या जिल्ह्यात शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण केले जाईल.
जिल्ह्यातील स्थळसुद्धा निश्चित झाले आहे. पालघर येथील दोन एकर जागा असलेल्या जागेत, ग्रामीण रुग्णालयात किंवा कोलगाव येथे महाविद्यालय स्थापन होईल. गडचिरोलीत सामान्य रुग्णालय किंवा स्त्री रुग्णालयातील शिल्लक असलेल्या पाच एकर जागेत प्रस्तावित आहे. तसेच सामान्य रुग्णालयालागून वनविभागाच्या मालकीच्या २२० एकर जागेपैकी ५० एकर जागा उपलब्ध झाल्यास महाविद्यालय स्थापन होईल. अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा स्त्री रुग्णालयात तात्पुरत्या जागेत सुरू केले जाईल. मात्र नांदगावपेठ येथे उपलब्ध असलेली १८ हेक्टरची शासकीय जागा विचारार्थ आहे.
वाशीममध्ये मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील ७७ एकर जागा प्रस्तावित आहे. जालन्यात २५ एकर शासकीय जागा उपलब्ध आहे. बुलढाणा येथे आरोग्यधाम परिसरातील २३ एकर जागा हस्तांतरित झाल्यास किंवा बुलढाणालगत हातेडी गावात उपलब्ध असलेल्या २० एकर जागेत बांधले जाईल. अंबरनाथ येथे लोकनगरीलगत २६ एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. अहमदनगर येथील सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील जागा प्रस्तावित आहे. भंडारा येथे महसूल विभागाची टेकडीवरील २५ एकर जागा उपलब्ध आहे. हिंगोलीत सामान्य रुग्णालयातील १२ एकरच्या परिसरात किंवा पशुसंवर्धन विभागाच्या जागेत होईल. वर्धा येथे साटोडा गावात १७ एकर शासकीय जागा उपलब्ध आहे. तूर्तास या जिल्ह्यातील आरोग्य विभागाची जिल्हा रुग्णालये तात्पुरत्या स्वरुपात हस्तांतरित करण्याचा निर्णय आहे.
जागेबाबत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मापदंडात काही अटी शिथिल करण्यात आल्या आहे. त्यामुळे महाविद्यालयासाठी एकत्रित जागा उपलब्ध नसल्यास दोन वेगळ्या भूखंडावर बांधकाम शक्य आहे. शासनाने नव्या वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हे घोषित केले होते. मात्र, जिल्ह्यात कुठे स्थापन होणार याबाबत संभ्रमच होता. परिणामी काही जिल्ह्यात आपल्याच मतदारसंघात हे प्रस्तावित महाविद्यालय व्हावे म्हणून आमदारांत चढाओढ लागल्याचे दिसून येत होते. मात्र, शासनाने स्थळनिश्चिती केल्याने त्याच जागेवर ते होणार आहे. ऐनवेळी राजकीय दबावातून स्थळ बदलणार काय, हे पुढेच दिसेल.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर