
रोकड वाडी, गणपत भारी, नांदगाव कोहोळी रोडच्या कडेला घाणीचे साम्राज्य .
प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर ji24news
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोकड वाडी गणपत वारी तसेच नांदगाव कोळी रोडला घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे या रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण फेकलेली जाते या घाणीमध्ये प्लॅस्टिक तसेच खरकटे पत्रावळ्या काचा अशा मोठ्या प्रमाणात घाण फेकलेली जाते या घाणीमुळे अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे आणि घाणीमुळे रोगराई होण्याची भीती आहे त्यामुळे नगरपालिका तसेच ग्रामपंचायत तसेच वन विभाग यांच्या हद्दीतीलप्रशासनाने लक्ष दिले पाहिजे जो कोणी घाण फेकत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जी काही घाण फेकलेले आहे ती दुर्गंधीयुक्त घाण हटवावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
प्रतिनिधी, जयवंत होगोटे त्रंबकेश्वर
Total Users : 10828