
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद गावामधील दोन दिवसांपूर्वी एका छोट्याश्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिचा मृत्यू..
प्रतिनिधी, जयवंत होगोटे त्रंबकेश्वर –ji2 4 न्यूज .
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद गावामधील दोन दिवसांपूर्वी एका छोट्याश्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिचा मृत्यू झाला त्यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ वनविभागाचे अधिकारी यांना पीडित मुलीच्या घरी बोलावून जास्त कॅमेरे वाढवायला सांगितले व अजून पिंजरे लावायच्या सूचना दिल्या व तेथील आजुबाजूची जनता भीतीच्या वातावरणात असल्याने लवकरात लवकर नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा व त्या भागात रानडुकरांचा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात त्रास असल्याने त्या रानडुकरांचा पण बंदोबस्त करण्याच्या सूचना देऊन त्या पीडित सकाळे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देण्याचे काम केले व दोन-तीन दिवसात शासकीय मदत त्या पीडित सकाळे कुटुंबाला देण्याची सूचना वनविभागाला देण्यात आली त्याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष उत्तम लिलके, जिल्हा संपर्कप्रमुख मोहन खाडे, सोमनाथ खोटरे, अनिल राऊत, हर्षल जाधव व आदी पदाधिकारी उपस्थित होते

Total Users : 10829