
विक्रमगड -गावितपाडा बोहाडा मोठ्या उत्साहात साजरा…..
प्रतिनिधी- दीपक सुरेश भोये. ji 2 4 news
-पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आदिवासी संस्कृतीचे वारसा नृत्य अविष्कराची परंपरा जोपासणारा जगदंबे मातेचा उत्सव अर्थात बोहाडा या उत्सवाला ग्रामीण भागात सुरुवात झाली. विक्रमगड तालुक्यातील गावितपाडा हनुमान जयंती नंतर बोहाडा भरविला जातो. ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. मागील तीन वर्षे कोरणा सावट खाली उत्सव संक्रात आली होती त्यामुळे बोहाडा भरवले जात नव्हते. ग्रामीण भागात बोहाडा सुरुवात झाली आहे. बोहाडा उत्सवात पारंपारिक वेशभूषा परिधान करून देव-देवतांची सोंगे नाचवली जातात. रामायण व महाभारत देव-दानव यांच्या लढाया नाट्य सादर केल्या जातात. ही सर्व बोहाडा सोंगे पारंपारिक संबल सनई च्या तालावर काढली जातात. इंद्र ,देव, राम ,कृष्ण, हनुमान, रावण, होडी, अंबाबाई, विविध देव-देवता रात्रभर सोंगे काढली जातात. बोहाडा हजारो भाविकांची गर्दी केली जाते. सकाळचे वेळेल जगदंबा मातेचे सोंगे काढले जाते. जगदंबा मातेला नवस केले जातात. ते नवस पुर्ण झाल्यावर भाविकांकडून बकरे कोंबडाचाचा बळी दिला जातो. आदिवासी ग्रामीण भागात ही प्रथा रूढ आहे.

Total Users : 10829