ji24news

कर भरा आणि वर्षभर फुकट दळून न्या, कर वसुलीसाठी मनसावळी ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल…

कर भरा आणि वर्षभर फुकट दळून न्या, कर वसुलीसाठी मनसावळी ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल…..

प्रा.दिनेश राठोड (ji24news)जिल्हा प्रतिनिधी – वर्धा.

वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनं एक अनोखी शक्कल लढवली आहे.
ग्रामपंचायतीचे सर्व कर भरा आणि वर्षभर गिरणीतून मोफत धान्य दळून न्या अशी योजना ग्रामपंचायतीनं राबवली आहे. ग्रामपंचायतीनं वेगळी योजना राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.
स्वयंपाकासाठी लागणारे पिठ गिरणीतून दळून आणलं जातं. पण हेच दळण गावकऱ्यांना वर्षभर मोफत मिळत असेल तर पर्वणीच म्हणावी लागेल. गावाला नि:शुल्क दळण दळून मिळण्याची ही संधी मनसावळी या वर्धा जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावकऱ्यांना मोफत दळण दळून जर पाहिजे असेल तर मात्र ग्राम पंचायतीला शंभर टक्के कर भरणा करणे अत्यावश्यक आहे. या अटीवरच गावात ग्राम पंचायतने पुढाकार घेऊन उभारलेल्या पीठ चक्कीवर मोफत दळून दिले जात आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी कर रुपात उभा केला जातो. पण अलीकडे कर भरण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने मनसावळी ग्रामपंचायतीने शंभर टक्के कर भरा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या ! ही संकल्पना सुरू केली आहे.
ग्रामपंचायतीच्या या संकल्पनेचा गावाला फायदा देखील व्हायला लागला आहे. नागरिक आपले घर आणि पाण्याचा टॅक्स भरून आपली जबाबदारी पूर्ण करू लागले आहे. घर कराची पावती गिरणीवर दाखवायची आणि आपले गहू, ज्वारी, बाजरी, डाळ आदी धान्य दळून न्यायचे, असाच नित्यनियम गावकरी पाळताना दिसत आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच प्रांजली मुकेश भोयर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या प्रयोगाने कर गोळा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 1200 लोकसंख्या असलेल्या मनसावळी या गावात 2021-22 मध्ये 1 लाख 50 हजार इतकी कर वसुली झाली होती. तर 2022-23 मध्ये 1 लाख 90 हजार इतकी कराची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे.
बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतीचा कारभार देखील हायटेक झाला आहे. काही ग्रामपंचायतीत देखील नवे प्रयोग सध्या राबवले जात आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, याकरता ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी पूर्णपणे ऑनलाईन सुविधा दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी क्यूआर कोड बनविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रयोगाचे चांगलेच कौतुक होत आहे. ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी ऑनलाईन भरता येणार आहे. ‘क्यूआर -कोड’ मुळे आजच्या काळात आर्थिक व्यवहार करणे हे सोपे झाले आहे. ग्रामपंचयतीमध्ये प्रत्येक घरावर ‘क्यूआर कोड’ लावण्यात आले आहे. क्यूआर कोड’ (QR Code) स्कॅन करून घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर