
विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपूरमध्ये सूर्य तळपला, जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद….
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी -वर्धा..
राज्यात एकीकडे अवकाळी पावसामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. राज्यात एकीकडे पावसाच्या कोसळधारा पडत आहेत. तर दुसरीकडे उन्हाच्या चटक्यामुळे उष्णता वाढली असून अंगाची लाही लाही होत आहे.
गेले दोन दिवस आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. त्यात विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंश से.हून पुढे गेले आहे. गुरुवारी चंद्रपूर येथे या ऋतूमधील सर्वाधिक 43.2 अंश से. तापमान नोंदले गेले. वर्ध्यामध्ये 42.2 अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा जगातील सर्वात उष्ण शहरामध्ये नवव्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरात देशातील आठ शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे आहेत. वर्धा आणि चंद्रपूर या दोन ठिकाणाचा जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाणामध्ये सहभाग झालाय.
Total Users : 10829