
मुक्तांगण स्कूलचा ,’बचपन बचाव’ एक अनोखा उपक्रम
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
आजच्या धावपळीच्या युगात लहान मुलांचे बालपण हरवलेले दिसते .लहानपणीचे खेळ धांगडधिंगा ,बाल सुलभकृती यावर सर्वतोपरी नियंत्रण आलेले आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक विकास खुंटलेला आहे. एकमेकांशी असलेला संबंध सुद्धा दुरावलेला आहे .सतत अभ्यासाच्या ओझ्याखाली बालपण लुप्त होत आहे. पालकही त्यांना मनसोक्त खेळणे त्यांच्या नैसर्गिक कृतीला वाव देणे हे न करता केवळ क्रमिक अभ्यासाच्या आधारावर विद्यार्थ्यांचा विकास साधू इच्छिता आनि rat race मध्ये आपल्या मुलांना दौडवितात. सतत पुस्तकाच्या अभ्यासाच्या ओझ्याखाली असल्यामुळे स्वतःचा स्वतंत्रपणेपणे विद्यार्थ्यांना विचार करण्याची मुभा उरलेली नाही. या सर्व गोष्टीपासून विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास साधण्यासाठी ,वाव देण्यासाठी मुक्तांगन स्कूलमध्ये आज ‘टब पार्टीचे’ आयोजन करण्यात आलेले होते .परीक्षानंतरचा ताण कमी व्हावा व विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी, उद्या शाळेत जाण्याची उत्सुकता सतत असावी यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता .
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्स मधून मनमुराद आनंद घेतला . उन्हाळ् सुट्टीत येणारे विद्यार्थ्यांचे वाढदिवसही या प्रसंगी साजरे करण्यात आले, नंतर त्यांना खाऊ वाटप करण्यात आला .कार्यक्रमाचे आयोजक वैशाली ठाकरे व वर्गशिक्षिका पल्लवी व मनस्वी मिस यांनी परिश्रम घेतले सर्व शिक्षक वर्ग ही आपले वय विसरून बालपणनाचा आनंद घेतला या कार्यक्रमात मुक्तांगण स्कूलचे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले होते
Total Users : 10828