
हेदुलीपाडा गावातील नागरिकांना रेशन धान्य घेण्यासाठी 4 किलोमीटर पायपीट.
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर ji24news.
केंद्र सरकार देशातील गोरगरिबांसाठी दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकार मोफत धान्य वाटप योजना राबवत आहे आणि या कोट्यावधी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे तसेच त्रंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा या गावातील नागरिकांना रेशन धान्य घेण्यासाठी चार किलोमीटर अंतर कापून वेळुंजे या गावात पाई पाई जावे लागत आहे म्हणून
त्रंबकेश्वर चे तहसीलदार साहेब यांनी या गावाकडे लक्ष देऊन हेदुलीपाडा या गावांमध्ये रेशन धान्य वाटप करण्यासाठी रेशन दुकानदाराला सांगण्यात यावे की हेदुलीपाडा गावच्या नागरिकांची पायपीट थांबली पाहिजे अशी हेदुलीपाडा या गावच्या नागरिकांची मागणी आहे

Total Users : 10829