ji24news

विदर्भात उष्णतेची लहरतापमान ४३.६ अंशावर….

विदर्भात उष्णतेची लहर तापमान ४३.६ अंशावर…

प्रा.दिनेश राठोड(ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा;;

राज्यातील पूर्वविदर्भात उष्णतेची चांगलीच लहर आल्याने विदर्भ तापला आहे. बुलढाणा वगळता सर्वच जिल्ह्यातील तापमानाने उसळी घेतली आहे.
विशेष म्हणजे वर्धा व चंद्रपूरसह, गोंदिया,गडचिरोलीच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. या मध्ये अनुक्रमे 43.3, 43.2 43.0 तर 40.6 अंशाने नोंद घेण्यात आली आहे. तसेच अमरावती 43.1 तर ब्रम्हपूरी 43.2 तापमानाची नोंद मंगळवारी (दि. १८) घेण्यात आली. आठवडाभरापासून चंद्रपूर व ब्रम्हपूरीचे तापमान 43 वर असल्याने तापमानात दरदिवशी वाढ होत आहे. उष्ण लहरीचा नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे.
देशात उष्ण शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर, ब्रम्हपूरी मध्ये तापमानात सतत वाढ होत आहे. आठवडाभरापासून दोन्ही ठिकाणी तापमान 43 अशांचे वर आहे. आज मंगळवारी तापमानाची नोंद घेण्यात आली त्यामध्ये चंद्रपूर राज्यात सर्वात हॉट ठरले आहे. चंद्रपूर 43.6 तर ब्रम्हपुरी 43.2 अंश सेल्सिअस नोंद घेण्यात आली आहे. तसेच अमरावतीने चंद्रपूर शहराप्रमाणे तापमानात उसळी घेतली असून 43.1 तापमनाची नोंद करण्यात आली. वाढलेल्या तापमानामुळे आज मंगळवारी सकाळपासून उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहेत. उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे.
चंद्रपूर प्रमाणे विदर्भातील गोंदिया, वर्धेच्या तापमानात वाढ झाली आहे. जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या गडचिरोली मध्ये पारा चढला आहे. गोंदिया 43.2, वर्धा 43.0, यवतमाळ 43.0, अकोला 42.8, नागपूर 41.2, वाशिम 42.0 अशी नोंद घेण्यात आली आहे. नेहमी चाळीशीच्या खाली असणारा गडचिरोली ‍जिल्हा आज मंगळवारी 40.6 वर पोहचला आहे. विदर्भातील बुलढाण्याचे 39.2 अंश तापमान वगळता सगळे जिल्हे चाळीशी ओलांडीत पूढे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे येत्या दिवसात पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्कॉय वॉच या खगोलीय संस्थेने नोंदविलेल्या तापमानात आज दुपारी तिन वाजता 44 अंश तापमानाचीनोंद घेण्यात आल्याचे स्कॉय वॉच संस्थेचे प्रा. सुरेश चोपणे यांनी माहिती दिली.
देशात सर्वात उष्ण शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदपूर शहरात व जिल्ह्यात सतत तापमान वाढ होत असल्याने कडक उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत आहे. यावेळी वर्धा, गोंदिया, अमरावती ‍जिल्ह्यातील तापमान चंद्रपूरच्या मागे धावत उसळी घेत आहे.वि शेष म्हणजे गडचिरोली हा जंगलाचाजिल्हाह असूनही तापमान 40 अंशा पार गेले आहे. विदर्भात एप्रिल महिण्यातच सुर्य कोपला असून मे व जून अजून यायचा आहे. येत्या काळात तापमानाची तिव्रता वाढणार असल्याचे सांगीतले जात आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर