
आदिवासी समाजावरील अन्याय कदापि सहन केला जाणार नाही – पालघर जिल्यातील सर्व आमदार व संघटना…….
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड ji24news
बडोदा एक्सप्रेस हायवे प्रकरण संदर्भात दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी धानीवरी ता डहाणू जि पालघर येथे आदिवासी समाजावर प्रशासन आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा माध्यमातून करण्यात आलेल्या अत्याचार विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी आज पालघर जिल्ह्यामधील आपला माणूस आपला आमदार सुनिल भुसारा, लकीभाऊ जाधव प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, माजी खासदार बळीराम जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटले
मा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याना आमदार सुनिल भाऊ भुसारा साहेब यांनी सर्व आमदार तसेच संघटना संस्था प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य पक्षीय पदाधिकारी यांचा सह्यांचे निवेदन देऊन दोषीं अधिकारी आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचावर निलंबनाची मागणी केली
त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा काशिनाथ दादा चौधरी, रामदास हरवटे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,जि प सदस्य जयेंद्र दुबळा, डॉ सुनिल पऱ्हाड, आप काळुराम काका धोदडे, अँड. विराज दादा गडग आदी उपस्थित होते.
Total Users : 10829