ji24news

आदिवासींना मोफत प्रशिक्षण द्याट्रायबल फोरमची मागणी :नीट,जेईई पात्रता परीक्षा.

आदिवासींना मोफत प्रशिक्षण द्या
ट्रायबल फोरमची मागणी :नीट,जेईई पात्रता परीक्षा.

नंदुरबार.ji24news

अक्कलकुवा : डॉक्टर ,इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नीट,जेईई या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात. या पात्रता परीक्षा पास होण्यासाठी क्लाँसेस लावावे लागतात.या क्लाँसेसचा खर्च वर्षाला दोन ते चार लाख रुपये येतो.आदिवासी विद्यार्थी लाखोंचा एवढा खर्च कोठून करणार ? असा प्रश्न उपस्थित करत महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयनेही आदिवासी विद्यार्थ्यांना डाँक्टर, इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट,जेईई पात्रता परीक्षेच्या तयारी करीता पुर्व परीक्षा मोफत आँनलाईन प्रशिक्षण देण्याची मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार या संघटनेने केली आहे.

या संदर्भात आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांना मा.तहसीलदार यांच्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांची डॉक्टर व इंजिनिअर बनण्याची इच्छा असली तरी पालकांची आर्थिक परिस्थिती व क्लाँसेसची फी यामुळे इयत्ता दहावी नंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश प्रवेश घेऊ इच्छित असलेले सामान्य व साधारण कुटुंबातील आदिवासी विद्यार्थी नीट,जेईईचे महागडे प्रशिक्षण क्लाँस लावू शकत नाही.

आदिवासी समाजातील सर्व सामान्य कुटुंबातील मुले -मुली डाँक्टर, इंजिनिअर झाले पाहिजे.यासाठी त्यांना नीट,जेईई परीक्षा पूर्व मोफत आँनलाईन प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली आहे. आणि त्यातील जे विद्यार्थी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नीट,जेईईची तयारी करुन डॉक्टर ,इंजिनिअर होण्याची स्वप्ने बाळगून आहे.

अशा आदिवासी विद्यार्थ्यांना नीट व जेईईचे परीक्षा पुर्व मोफत आँनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करुन प्रशिक्षण देण्यात यावे.अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.जिल्हाध्यक्ष नितीन तडवी, जिल्हा सचिव रविंद्र वळवी , जिल्हा कोषाध्यक्ष वसंत वसावे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश वळवी,जिल्हा संघटक अनिल वसावे, तेजस पाडवी, सुनिल वसावे
रवी पावरा आदी उपस्थित होते

” महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने ओबीसी,व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नीट,जेईई मोफत प्रशिक्षण असलेली चांगली योजना तयार केलेली आहे.
याच धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्धेने सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अशीच योजना तयार करुन लाभ द्यावा म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे.
– नितीन तडवी , जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम नंदुरबार.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर