
ग्रामीण कला मंचच्या वर्धापनदिनानिमित्त ” रेड लाईट ” नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आचार्य अत्रे रंगमंदिर – कल्याण येथे संपन्न…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी हेमंत घाटाळ
कल्याण : दि.24 एप्रिल, दैनिक अग्रलेखच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आणि ग्रामीण कला मंचच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण येथील अत्रे रंगमंदिरात नुकतेच ” रेड लाईट ” या दोन अंकी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर झाला . या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . यावेळी दैनिक अग्रलेखच्या सर्व प्रतिनिधींचा तसेच ग्रामीण कला मंचच्या सर्व कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला .
वेश्या वस्तीतील महिलांचे राहणीमान , त्यांच्या मुलांना समाजाकडून सोसावी लागणारी अवहेलना , सामाजिक विषमता , राजकीय गुंडांकडून होणारा त्रास असे अनेक विषय ” रेड लाईट ” या नाटकातून उत्तम प्रकारे मांडण्यात आले. या नाटकामुळे वेश्यांबद्दलची सामाजिक मानसिकता बदलण्यास नक्कीच मदत होऊन आणि त्यांना समाजात कनिष्ठ दर्जाची वागणूक मिळणार नाही अशी अपेक्षा आहे. यानाटकातील बऱ्याच प्रसंगांनी प्रेक्षक आणि रसिकांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवले.तसेच त्यांना अंतर्मुख करून विचार करण्यास प्रवृत्त केले. नाटकातील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच उपस्थितांनी टाळयांच्या प्रचंड कडकडाटाने कलाकारांच्या अभिनयाची दाद दिली.
श्री.उमेश मारुती भेरे यांनी या नाटकाच्या लेखनासह निर्मिती , दिग्दर्शन , नैपथ्य ,पार्श्वसंगीताची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली आहे .या नाटकात डॉ .सोनाली म्हाळसाने बऱ्हे , प्रणाली गणवीर – पाटील आणि प्रसाद वैद्य यांनी प्रमुख भूमिका साकारून नाटकाला अभिनयाची चांगली उंची दिली तर नितीन गाडेकर , अहिल्या मोरे , सुशील शिरसाठ , सुरेश भेरे , महेश खाडे , माधुरी सविता , कविता कोर , दिव्या शिर्के , अविनाश दलाल , भरत फर्डे, धनेश पाटोळे , अश्विनी मोरे , संतोष जाधव आणि गणेश किरपण यांनी उत्तम सादरीकरण केले . या नाटकाची प्रकाश योजना उमेश दुधाणे, विशाल पितळे यांनी केले , वेशभूषा मैथिली उमेश भेरे आणि रंगभूषा सोहम कोचरेकर यांनी केले .
दरम्यान , उपस्थित मान्यवरांनी दैनिक अग्रलेखच्या आठ जिल्ह्यातील भरारीचे कौतुक केले तर ग्रामीण कला मंचच्या चढत्या आलेखाचा मागोवा घेतला . या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे , अभिनेते दीपक खांडेकर , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेशकुमार धानके , शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विनायक सापळे , भारतीय मानव विकास सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश घेगडे , शिक्षण तज्ञ पद्मिनी कृष्णा , सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे , रमाबाई ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योतिताई गायकवाड , आपला चौथा स्तंभचे उपाध्यक्ष अशोक सांगळे व प्रीती बने , कोकण पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक बोराडे , ओबीसी महासंघाचे कोकण अध्यक्ष एकनाथ तारमळे ,लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अनिल घोडविंदे , पत्रकार राजेंद्र माने तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते .वर्धापनदिनाच्या पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चौधरी यांनी उत्तमरीतीने सादर केले.

Total Users : 10829