
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय – पालघर येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा ‘ पुनर्भेट सोहळा ‘ संपन्न…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी – प्रा.सोमनाथ सातपुते
पालघर दि.28 एप्रिल,सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे, सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा ‘ पुनर्भेट सोहळा ‘ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमासाठी मंचावर सचिव प्रा.अशोक ठाकूर ,प्राचार्य. डॉ.किरण सावे,उपप्राचार्य प्रा गोपीनाथ नागरगोजे, प्रा.प्रिती फणसेकर व पर्यवेक्षक प्रा.अरुण सुरथी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रा.डॉ.किरण सावे यांनी दीप-प्रज्वलन करून केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवराना गुलाब पुष्प देऊन व स्वागत गीत सादर करून केले. शुभेच्छापर संदेश देतांना डॉ. किरण सावे यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाची यशोगाथा सांगितली. तसेच या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वच प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले.कदाचित अशा प्रकारचा कार्यक्रम हा महाराष्ट्रतच नव्हे तर देशात देखील आयोजित झाला नसेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात 21 सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थिती दाखवली. प्रसंगी सर्वांचीच मुलाखत घेऊन त्यांच्याशी हितगुज करण्यात आले व त्यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जे सहकारी अनंतात विलीन झालेले आहेत अशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सेवानिवृत्त सहकाऱ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक चित्रफीत दाखवण्यात आली. त्याने सर्वच सेवानिवृत्त शिक्षक सहकार्यांना भावुक करून टाकले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वच प्राध्यापक बंधू-भगिनींनी विशेष मेहनत घेतली.
सर्वच सहकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी चोख पाडल्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी पार पडला असे मत प्रा. तेलमोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.गोपीनाथ नागरगोजे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा स्वनित पाटील व प्रा सारिंगा प्रभू यांनी केले व आभार प्रा. सुरेश हसबे यांनी मानले.

Total Users : 10829