ji24news

निसर्गाची लहर पावसाचा कहर.

निसर्गाची लहर पावसाचा कहर

प्रा.दिनेश राठोड (जिल्हा प्रतिनिधी – वर्धा)ji24news

सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी घायकुतीस आला आहे. शेकडो एकर शेतात पाणी साचले असून प्रामुख्याने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यास पावसाने झोडून काढले आहे.
एकशे आठ गावांना मोठा फटका बसला. वीज पडून आतापर्यंत ७५ जनावरे दगावली असून त्यात देवळी तालुक्यातील ६५ मेंढ्यांचा समावेश आहे. तीनशे चार कुटुंब मुसळधार पडल्याने बाधित झाली आहेत. सर्वाधिक पिकाचे नुकसान आर्वी तालुक्याचे झाले आहे.
संत्रा, पपई बाग गळून पडली. पन्नास पशू गोठे ध्वस्त झाले. खपरी येथे मुन, देठे, मीरा गायकवाड, मोहन भोयर यांचे संसार उघड्यावर आले आहेत. वडनेर बंभली या मार्गावरील लहान पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. तसेच बांबर्डा ते टेंभा मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. या पुलाची उंची वाढवावी म्हणून सातत्याने मागणी होत असते. आजही पावूस सुरूच असल्याने ग्रामीण भाग त्रस्त झाल्याचे चित्र आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर