ji24news

शालेय खेळाडूंना इतर खेळांसाठी सवलतीचे गुण मिळणार; क्रिकेटपटू मात्र वंचित,

शालेय खेळाडूंना इतर खेळांसाठी सवलतीचे गुण मिळणार; क्रिकेटपटू मात्र वंचित…

प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी वर्धा :

विद्यार्थी दशेत सर्वात अधिक खेळला जाणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. शाळेत किंवा उन्हाळी सुट्टीत याच खेळावर विद्यार्थांच्या उड्या पडतात. मात्र शाळेतील खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या गुणास ते पात्र ठरत नसल्याची बाब पुढे आली आहे.
सवलितीचे असे वाढीव गुण खेळ संघटनेच्या शिफारशीनुसार दिल्या जातात. खो खो, कबड्डी, जलतरण, व्होली बॉल व अन्य एकूण ४६ खेळांना हे गुण मान्य झाले आहेत. तर क्रिकेट, सिकई, डोज बॉल व थ्रो बॉल हे चार खेळ खेळणाऱ्या शालेय खेळाडूंना गुण मिळण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. कारण काय तर त्यांची संलग्नता नाही. शासन निर्णयानुसार क्रिकेट खेळ प्रकारच्या राष्ट्रीय संघटनेस केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाची सलग्नता नाही. तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन किंवा क्रिकेटच्या राज्य संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची संलग्नता नाही. तसे नसल्याने क्रीडा गुण मिळण्यास शालेय क्रिकेटपटू अपात्र ठरतात, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
इतर खेळातील शालेय खेळाडूंना विविध स्पर्धेत सहभागी असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यायचे आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभागी दहावी व बारावीत शिकणाऱ्या खेळाडूंना दहा ते वीस दरम्यान क्रीडा गुण दिल्या जात असतात.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर