
महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियनशिप संपन्न
प्रा.दिनेश राठोड (ji24news)जिल्हा प्रतिनिधी - वर्धा
स्थानिक वर्धा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रॅडिशनल शिंतो ऱ्यु कराटे अँड कुबुडो ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, लॉयन्स ट्रॅडिशनल शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडिया व स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन शिव वैभव सभागृह, बॅचलर रोड आर्वी नाका, वर्धा येथे दिनांक 7 मे 2023 ला यशस्वीरित्या पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबटकर साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ऑक्सिजन पार्क चे संचालक बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन पावडे साहेब मंचावर उपस्थित होते. स्पर्धेचे विभाजन काता, कुमिते या दोन प्रकारात करण्यात आले. उद्घाटनानंतर लगेच 8 ततामी, रिंग मध्ये काता, स्किल प्रकारचा स्पर्धा सुरू करण्यात आल्या.
वर्धा जिल्हा कराटे प्रशिक्षकांच्या एकतेचा संदेश महाराष्ट्रभर पसरविण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेल्या ऑल कराटे स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शिहान उल्हास वाघ, जिल्हा प्रभारी शिहान सुरेश खंजर, उपाध्यक्ष शिहान रमेश भगत, सचिव शिहान मंगेश भोंगाडे, कोषाध्यक्ष सेन्साई दिलीप कठाने, सभासद शिहान क्रिष्णा ढोबळे, सेन्साई शशिकांत बोडखे यांनी वर्धा जिल्ह्यात कराटे खेळाचा प्रसार प्रचार करून कराटे खेळाला मानाचे स्थान मिळवून दिल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री श्री. सुबोध मोहिते पाटील साहेब यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव शिहान अनवर अली, ट्रॅडिशनल शिंतो ऱ्यु कराटे अँड कुबुडो ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय संरक्षक अकमल शेख मंचावर उपस्थित होते. यावेळी सर्वाधिक टीम खेळवणाऱ्या टीम इन्स्ट्रक्टर मध्ये प्रथम स्थान प्राप्त शिहान मंगेश भोंगाडे आकर्षक ट्रॉफी व 5,000 रुपये रोख, द्वितीय स्थान शिहान रमेश भगत आकर्षक ट्रॉफी व 3,000 रुपये रोख तर तृतीया स्थान संतोष कडपेवाल आकर्षक ट्रॉफी व 2,000 रुपये रोख प्राप्त केले. तसेच शिहान उल्हास वाघ वर्धा, शिहान गणेश लांजेवार चंद्रपूर, सेन्साई सुधीर रिंके बुटीबोरी, शिहान कृष्णा ढोबळे वर्धा यांनी बेस्ट टीम ट्रॉफी प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते यांचाही सन्मान सत्कार करण्यात आला.
तसेच आयोजकांनी सोपवलेली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष सेन्साई सोनल रंगारी यांना आयोजन समितीतर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. नंतर लगेच 8 ततामी, रिंग मध्ये कुमिते, फाइट प्रकारचा स्पर्धा सुरू करण्यात आल्या.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणारे मास्टर ब्लॅक बेल्ट इव्हेंट पुरुष कुमीते गटात प्रथम स्थान अजय कान्हेरे वर्धा आकर्षक ट्रॉफी व 7000 रुपये रोख, द्वितीय स्थान दयाल धवणे वर्धा आकर्षक ट्रॉफी व 5000 रुपये रोख, तृतीय स्थान राहुल पटोळे नागपूर आकर्षक ट्रॉफी व 3000 रुपये रोख, महिला कुमीते गटात प्रथम अनुश्री पटेल नागपूर आकर्षक ट्रॉफी व 7000 रुपये रोख, द्वितीय सानिका नाइक नागपूर आकर्षक ट्रॉफी व 5000 रुपये रोख, तृतीय जानवी गुरव नागपूर आकर्षक ट्रॉफी व 3000 रुपये रोख, पुरुष काता गटात प्रथम श्रीरग मारोडकर नागपूर आकर्षक ट्रॉफी, द्वितीय श्रीधर खराबे भंडारा आकर्षक ट्रॉफी, महिला काता गटात प्रथम सानिका नाईक नागपूर आकर्षक ट्रॉफी समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष साहसिक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी कोटबकार यांच्या शुभहस्ते देऊन विजय खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ट्रॅडिशनल शिंतो ऱ्यु कराटे अँड कुबुडो ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय सल्लागार शिहान आशिषजी वांदिले साहेब मंचावर उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन शिहान शेख दत्तु, संचालन सुरेश दुधे, प्रस्तावना सेन्साई पराग पाटील तर आभार इलाई खान यांनी मानले. स्पर्धेत जवळपास 750 खेळाडूंचा सहभाग असून महाराष्ट्रातील 24 जिल्ह्याचे संघ स्पर्धेत सहभागी झाले.

Total Users : 10828