ji24news

वर्धा जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर शिबिरे.

वर्धा जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर शिबिरे.

प्रा.दिनेश राठोड – (जिल्हा प्रतिनिधी वर्धा)
सरकारी योजनांचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 75 हजार पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळून देण्यात येणार आहे. यासाठी तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यातील संबंधित नोडल अधिकारी तथा तहसिलदार यांनी सर्व विभाग यंत्रणांशी समन्वय साधुन शिबिराचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहे.
सेलू, कारंजा व हिंगणघाट येथे दि. 23 मे रोजी शिबिर घेतले जाणार आहे. देवळी, आर्वी व समुद्रूपर येथे दि.24 मे रोजी शिबिर होईल. वर्धा येथे दि.25 मे व आष्टी येथे 26 मे रोजी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर