ji24news

कासपाड्यातील शिक्षक अजित गोणते सरांचा सन्मानपूर्वक निरोप..


कासपाड्यातील शिक्षक अजित गोणते सरांचा सन्मानपूर्वक निरोप….

प्रतिनिधी – दीपक भोये विक्रमगड

कासड्यातील शिक्षक अजित गोणते सरांना ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांनी सन्मानपूर्वक निरोप दिला.

जिल्हा परिषद शिक्षक म्हटला की 10 ते 5 अशी वेळ पाळणारे शिक्षक दिसतात, पण अजित सर हे त्याहून अगदी वेगळे होते. गेली 14 वर्ष त्यांनी विद्यार्थी सर्वांगीण विकास व गुणवत्ता, क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील तालुका, जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून प्रत्येक पालक व ग्रामस्थांच्या मनात घर केले होते. तशातच शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रणालीद्वारे अजित सरांची जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा अशी दोन्ही ठिकाणी बदली झाली आणि कासपाड्यातील ग्रामस्थांना सरांचा निरोप द्यावा लागला..

“आमचे आदर्श शिक्षक आमचा अभिमान” असे पोस्टर लावून गावातील माता-भगिनी आरती ओवळत, रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी पुष्पवृष्टीने अभिषेक करित, पारंपरिक “तारपा” वाद्याच्या गजरात कासपाड्यातून सरांची मिरवणूक काढली. मिरवणुकीत सर्व पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ भावुक होऊन सरांसोबत सरांसाठी सर्वजण रडत होते. अनेकांना आयुष्याभर नोकरी करून सेवापूर्तीच्या शेवटच्या दिवशीसुद्धा असे प्रेम मिळत नाही, ते अजित गोणते सरांनी 14 वर्षात त्याच्या वयाच्या ऐन पस्तीशीत मिळविले.
लहानापासून पुण्यात शिकलेले ग्रामीण भागाचा त्यांचा काडीचाही संबंध नसलेले अजित सर जेव्हा या आदिवासी ग्रामीण भागात शिक्षक म्हणून नोकरीला लागले, इथले ग्रामीण विद्यार्थी, गाव, गावातील ग्रामस्थ जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बघितले तेव्हाच त्यांनी ठरवले होते की माझी खरी गरज इथे आहे. पुढे त्यांनी कासपाड्यातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ हेच माझे कुटुंब मानून गावासाठी खूप काही केले. अनेक उपक्रम राबवून त्यांनी गावातील लोकांची मने जिंकली.
या अजित सरांच्या प्रेमापोटी, आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती आपल्यातून सोडून चालली आहे म्हणून, जशी एखादी मुलगी लग्न होऊन सासरला जाते आणि तिला आपण आवंढा गिळत, कधी रडत-रडत निरोप देतो तसा सन्मानपूर्वक निरोप कासपाड्यातील ग्रामस्थांनी अजित सरांना दिला. या शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात समितीचे आजी-माजी अध्यक्ष- विलास गरेल, राजू खरपडे, सदस्य- साई फडवळे, मनीलाल फडवळे, दिनेश खरपडे, ज्येष्ठ नागरिक- यशवंत गरेल, धोंडू टोकरे, रामदास गहला, शिक्षक सहकारी-नरेश पाटील, कौशल्या मॅडम, शाळेसाठी वेळोवेळी मदत करणारे सुहृद फौंडेशनचे रितीन सर,लिप्सा मॅडम, कासपाड्यातील ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर