
सात वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला , कुटुबियांची भेट सांत्वन करीत आर्थिक मदतही केली ,
पालघर : ji24news.प्रतिनिधी सौरभ कामडी .
तालुक्यातील सायदे येथील छाया भोई या सात वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला याला कारणीभुत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी या मुलीच्या पालकांनी केली आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार सुनिल भुसारा यांनी या कुटुबांची भेट घेवून संपूर्ण घटनेची पाहणी केली.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडेही याबाबत चौकशी केली तसेच पिडीत कुटुंबाचे सांत्वन करून आर्थिक मदतही केली तर पालघर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्याशी संपर्क करून दोषींवर कारवाई करण्याच्या सुचना केल्या याशिवाय आदिवासींच्या आरोग्याबाबात हलगर्जी पणा करणाऱ्या यंत्रणाबाबत हयगय केली जाणार नसल्याचे यावेळी सांगितले.
तर भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य डॉ.हेमंत सवरा यांनीही या कुटुंबाची भेट घेवून परीस्थितीची माहिती घेतली तसेच अन्न धान्याची मदत करून सांत्वन केले.केवळ उपचार वेळेत न झाल्याने एका आदिवासी बालिकेचा जीव जावा हि बाब अतिशय क्लेषदायक असून खोडाळा येथे पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी माझी मागणी असून या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यांसबधी पालकमंत्री आणि संबंधित विभागाशी बोलणार असल्याचे यावेळी सवरा यांनी सांगितले.
Total Users : 10829