
इंदिरा गांधी विद्यालय वडणेर विद्यार्थ्यांचे सुयश.
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
उज्वल निकालाची परंपरा कायम.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज जाहीर केला असून. नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर द्वारा संचालित इंदिरा गांधी विद्यालय वडणेर या शाळेने आपला उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे. शाळेतून एकूण 34 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी प्राविण्य प्राप्त श्रेणीत उत्तीर्ण झाला असून प्रथम श्रेणी तर 07 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत16 उत्तीर्ण झाले आहे. कु श्रुतिका मनोहर सुपारे हिला 78.60% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर विद्यालयातून पृथ्वी विलास म्हरसकोल्हे याला 68.60% गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळवला, तिसरा क्रमांक मयुरी गजानन मडावी यांनी 64.40% गुण प्राप्त केले आहे, तसेच शाळेचा निकाल 91.17% लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय श्री कृष्णाजी महाजन साहेब,तथा शाळेचे मुख्याध्यापिका सन्मानिय सौ, वंदना खैरे . यांनी शाळेतील दहावीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन केले. व शाळेतील दहावीचे वर्गशिक्षिका सौ.कल्पना मडावी व शिक्षक श्री तलवटकर सर,कु.योगिता महाजन, श्री ओंकार मडावी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री डी डी गावंडे सौ.लता चंदनखेडे श्री अशोक मडावी आदींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्यात.
Total Users : 10829