
पालघरच्या महसुल तहसीलदार पदी स्नेहलता स्वामी रूजू
प्रतिनीधी/ पालघर ji24news.
जिल्हा अधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार या पदावर स्नेहलता स्वामी या काल रूजू झाल्या असून नांदेड येथून त्यांची सर्वसाधारन बदली यादीत झाली आहे.
स्नेहलता स्वामी या नांदेड येथे नायब तहसीलदार या पदावर कार्यरत होत्या मागील दहा वर्षाचा त्यांचा कार्यकाळ अतिशय उत्कृष्ट असुन नांदेड जिल्ह्यात त्यांनी मुदखेड,हदगाव व नांदेड शहर या ठिकाणी काम केले असून रेती माफीयांना सळो की पळो करून सोडले असून निवडणूक काळात कौशल्यपुर्ण कामगिरी केली आहे.
स्नेहलता स्वामी यांनी सोमवारी पालघर तहसील कार्यालयात प्रवेश करताच जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात जिल्हा अधिकारी यांचे समवेत सहभाग नोंदविला व वृक्षारोपण केले.
Total Users : 10829