
गणिताची जादू वेगळी या शैक्षणिक गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसात….
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – शाळा म्हटले की आपले एक मंदिर मानले जाते या ठिकाणी आपण जे पण शिक्षण घेतो ते एक आपल्या पुढील जीवनाचे मार्ग म्हणून. आणि म्हणून या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमिका निभावली जाते.
परंतु दोन ज्या मुख्य भूमिका असतात त्या म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक पूर्वी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असायची परंतु आता विद्यार्थी कृत भूमिका असणे गरजेचे मानले जाते.
म्हणून त्यासाठी शाळेमधील विद्यार्थांना योग्य कृती करून आणि शिक्षण देणे महत्वाचे मानले जात आहे त्यासाठी शिक्षकांना योग्य त्या कृत्या करून आणि विद्यार्थांना शिक्षण देणे खूप गरजेचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध कृत्त्या करून आणि शिक्षण दिले जात आहे.
अश्याच प्रकारे गांगोडी कुंडपाडा केंद्र बांधघर ता. डहाणू जि. पालघर. येथे जिल्हा परिषद शाळा गांगोडी कुंडपाडा केंद्र बांधघर ता. डहाणू जि. पालघर. या शाळेमध्ये लेखक श्री. श्रीकांत यशवंत पराड सर यांनी मुलांना म्हणजेच येथील विद्यार्थ्यांना मोलाचे योग्य मार्गदर्शन करून आणि गणित या विषया मधून योग्य ते मुद्धे काढून आणि या विद्यार्थ्यांना गणिताची जादू वेगळी या गाण्याच्या साहाय्याने योग्य ते मार्गदर्शन करून आणि एक वेगळीच आवड निर्माण केली आहे.
आणि या गाण्याच्या साहाय्याने प्रत्येक शाळेला योग्य ते शिकायला मिळेल. या पद्धतीने लेखक श्री. श्रीकांत यशवंत पराड सर आणि गायक श्री विशाल पटेल यांनी गावून आणि नेमलेले आहे.
हे गाणे बनिवण्याचं उद्दिष्ट की विद्यार्थ्यांच्या मध्ये गणित या विषयावर अधिक पकड निर्माण व्हावी गणित हा विषय आवडीने व खेळाने शिकवल्यास. विद्यार्थी खूपच आवडीने शिकतो..आणि पुढच्या स्टेप कडे जाण्याचा प्रयत्न करीत असतो..तसेच गणित या विषयाबद्दल आपुलकी, प्रेम, रस, वाढण्यास मदत होईल या उद्दिष्टाने हे गीत बनिवले आहे…
आणि म्हणूनच येथील ग्रामस्थांनी या नियोनाबद्दल खूप खूप आभार व्यक्त करून आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Total Users : 10829