
श्री गणेश विद्या मदिर शाळेत विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवसाचा शुभारंभ .
दिवा – (सचिन शेलवले ) i24news
शिवदत्त ज्ञानप्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्या दिवशी प्राथमिक विभागातील इयत्ता १ ली ते ७वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत केले . सर्व शाळेची ईमारत तसेच वर्ग पहिल्याच दिवशी फुगे , तोरण लावून सजवण्यात आली . या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष लिलावती म्हात्रे मॅडम सचिव साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे, केतकी म्हात्रे मॅडम , गिता म्हात्रे मॅडम तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद हजर होते . संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ चा प्रारंभ शाळेच्या पहिल्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या . तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना जिवनविद्येचे मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी तुच तुझ्या जिवनाचा शिल्पकार म्हणुन जिवन विद्या मिशनचे प्रज्ञा शिर्के मॅडम विक्रोळी तसेच त्यांचे सहकारी पूर्ण टीम हजर होती . सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला . पूर्ण दिवसभर मुलांना खेळ , गाणी, गोष्टी सांगुन तसेच अभ्यासाचे महत्व समजावून सांगुन सर्व वातावरण आनंददायी व उत्साहदायक ठेवण्यात आले . यात सर्वांनी सहभाग घेतला . अशा प्रकारे शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ झाला .
Total Users : 10829